साहित्य
मैदा, बेसन, तेल, ओवा, मीठ, जिरे, धने, बडीशेप, तीळ, किसलेल सुक खोबरे, साखर, लाल तिखट, गरम मसाला, आमचुर, हळद, हिंग, मीठ
कृती
सर्वप्रथम, एक कढईत जिरे, धने , बडीशेप, तीळ, किसलेले सुके खोबरे व्यवस्थित भाजून घ्या. यानंतर सर्व मसाले मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्या. त्यातच साखर. लाल तिखट, गरम मसाला, आमचूर, मीठ आणि हिंग टाकून मसाला मिक्स करून घ्या.नंतर मळलेल्या पिठाच्या गोळी करुन मोठी पाती लाटून घ्या. त्यानंतर त्यावर चिंच गुळाची चटणी सर्वत्र पसरवून लावा. त्यावर तयार बाकरवडीचा मसाला पसरवा. त्यानंतर हलक्या हाताने त्यावर लाटणे फिरवा. त्यानंतर पातीची गोल गोल वळकुटी करा म्हणजेच गोल गुंडाळा. त्यानंतर तयार वळकुटीटे बारीक काप करून घ्या. गरम गरम तेलामध्ये ते तळून घ्या. विकत मिळते तशी कुरकुरीत बाकरवडी तयार आहे.