साहित्य
बासमती तांदूळ, पत्ता कोबी, शिमला मिरची, गाजर, कांदा, कांद्याची पात, आलं लसूण, हिरव्या मिरच्या, शेजवान सॉस, सोया सॉस, ग्रीन चिली सॉस. पांढऱ्या मिरची पावडर, तेल, मीठ
कृती
सर्वप्रथम, बासमती तांदूळ चार तास भिजवून ठेवावा त्यानंतर तांदूळ शिजवून मोकळा भात करावा. शिमला मिरची, गाजर आणि पत्ता कोबी आणि फूल कोबी बारीक चिरावी. यानंतर कढईत तेल गरम करून त्यात आलं लसूण, कांदा चांगले परतून घ्या. गाजर, शिमला मिरची, पत्ता कोबी, हिरवी मिरची टाका आणि चांगल्याने परतून घ्या. त्यानंतर त्यात शिजवलेला भात टाका आणि मिश्रण एकत्र करा. त्यात चवीनुसार मीठ टाका. त्यानंतर त्यात ग्रीन चिली सॉस, सोया सॉस आणि शेजवान सॉस टाका. पांढऱ्या मिरचीचं पावडर त्यात टाका. त्यात पांढरे व्हिनेगर टाका आणि सर्व मिश्रण मिक्स करा. तयार आहे चायनीज व्हेज फ्राइड राइस