साहित्य
मैदा, बारीक चिरलेली मेथी, धनेपुड, जिरे पावडर, लाल तिखट, हळद, धनेपूड, तेल, ओवा, मीठ
कृती
सर्वप्रथम एका भांड्यामध्ये प्रमाणानुसार मैदा घ्या. त्यात बारीक स्वच्छ पाण्याने धुतलेली आणि बारीक चिरलेली मेथी टाका. त्यानंतर त्यात लाल तिखट, हळद, धनेपूड आणि जिरे पावडर टाका. त्यात थोडा ओवा टाका. चवीनुसार मीठ टाका. मिश्रणाच्या प्रमाणानुसार थोडे तेल टाका. सर्व मिश्रण एकत्र करा आणि पाण्याने मळून घ्या.
या मळलेल्या पीठावर मैदा टाकून लाटून घ्या आणि शंकरपाळे सारखे काप पाडा. कढईत तेल गरम करा आणि हे मेथीचे शंकरपाळे मंद आचेवर तळून घ्या. मेथीचे शंकरपाळे तयार होईल.