दिवाळीच्या आगमनाची चाहूल लागली असतानाच नोव्हेंबर मध्ये अवकाशातही खगोलीय घटनांनी जणू दिवाळी साजरी होणार आहे. या महिन्यात घडणाऱ्या खगोलीय घटना गुरु पृथ्वीजवळ येत असून तेजस्वी दिसणार आहेत. त्याचप्रमाणे पहाटे शुक्र अधिक तेजस्वी दिसेल. चंद्राची शुक्र शनि आणि बुध ग्रहांची युती होणार आहे.
दोन उल्का वर्षाव आणि धुमकेतू दिसणार आहेत या अनोख्या सुवर्णसंधीचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. दि. 3 नोव्हेंबरला गुरु पृथ्वी जवळ येत आहे. संपूर्ण महिन्यात पूर्वेला संध्याकाळी साध्या डोळ्यांनी सर्वाधिक तेजस्वी दिसणार आहे. नऊ नोव्हेंबरला पहाटे पूर्वीला शुक्र आणि चंद्राची युती दिसेल. त्याचप्रमाणे दि 10 नोव्हेंबरला सी 2023 जवळ येणार असून तो दुर्बिणींने दिसणार आहे.
दि. 13 नोव्हेंबर युरेनस ग्रह पृथ्वी जवळ येणार असून तो साध्या डोळ्यांनी दिसेल. 14 नोव्हेंबरला संध्याकाळी सूर्य मावळताच चंद्र आणि बुध सोबतच मंगळ ग्रहाची युती दिसेल. बुध ग्रहाच्या जवळ मंगळ ग्रह सुद्धा पाहण्याची संधी आहे. तसेच दि. 17 आणि 18 नोव्हेंबरला रात्री पूर्व दिशेला लिहून उल्का वर्षाव पहायला मिळेल ताशी 20 उल्का असण्याचा अंदाज आहे. 20 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी चंद्र आणि शनीची युती दिसेल. दि. 25 नोव्हेंबरला संध्याकाळी चंद्र आणि गुरू ग्रहाची युती पाहायला मिळणार आहे. तसेच 27 नोव्हेंबरला कार्तिक पौर्णिमा असून चंद्र तेजस्वी दिसेल. दि 28 नोव्हेंबरला पहाटे शुक्र ग्रह पृथ्वीच्या जवळ येत असल्याने तेजस्वी दिसणार आहे.