साहित्य
ज्वारी, लसूण, खोबरे, कोथिंबीर, तेल, मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा, मुग डाळ, तुरीची डाळ, तूप, पाणी
कृती
सर्वप्रथम, ज्वारी सुरुवातीला स्वच्छ धुवून घ्या आणि पाण्यात अर्ध्या तासासाठी भिजू घाला. ज्वारीतील पाणी काढून टाका आणि ज्वारी मिक्सरमधून पाणी न टाकता बारीक करा ज्यामुळे ज्वारीचा भरडा होईल. लसूण, खोबरे आणि कोथिंबीर एकत्र करा आणि मिक्सरमधून बारीक करा. यानंतर कुकरमध्ये तेल गरम करून घ्या. गरम तेलात मोहरी, जिरे, हिंग आणि कढीपत्ता टाका. त्यात बारीक चिरलेला कांदा टाका आणि परतून घ्या. त्यात हळद घाला आणि चवीनुसार हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे घाला. लसूण, खोबरे आणि कोथिंबीरचे बारीक केलेले मिश्रण यात टाका आणि परतून घ्या
त्यानंतर मूग डाळ आणि तुरीची डाळ स्वच्छ धुवून यात टाका. त्यानंतर मिक्सरमधून बारीक केलेलं ज्वारीचं पीठ घाला आणि चांगलं परतून घ्या. ज्वारीच्या खिचडीला पाणी भरपूर लागतं त्यामुळे एक कप ज्वारीला चार कप पाणी टाकावे. या प्रमाणानुसार पाणी घाला. मंद . आचेवर कुकरच्या दोन शिट्ट्या होऊ द्या. तयार आहे ज्वारीची खिचडी.