मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या पूर्णाकृती ब्राँझच्या पुतळ्याचे बुधवारी वानखेडे स्टेडियमवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अमोल काळे यांनी अनावरण केले. या कार्यक्रमानंतर सचिन तेंडुलकरने वानखेडे स्टेडियम वरील आपल्या पहिल्या भेटीची मजेशीर आठवणी सांगितली.
मी दहा वर्षांचा असताना पहिल्यांदा वानखेडे स्टेडियमवर आलो होतो आणि तेव्हा मला लपवून ठेवण्यात आले होते अशी आठवण सचिनने सांगितली सचिनने एप्रिल मध्ये वयाचे अर्धशतक पूर्ण केले त्याचा सन्मान करण्यासाठी एमसीएने वानखेडे स्टेडियम पूर्णाकृती पुतळा स्थापन केला. यावेळी सचिनच्या कुटुंबीयांसह क्रीडामंत्री संजय बनसोडे आयसीसी व बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार अध्यक्ष उपाध्यक्ष राजीव शुक्ला सचिव जयेशाह खजिनदार आशिष शेलार आणि एमसीएचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
वानखेडेवरील माझी पहिली भेट मजेशीर होती जी कोणालाच माहीत नाही 1983 चा विश्वचषकानंतर वेस्टइंडीज संघ भारत दौऱ्यावर आला होता. तो सामना पाहण्यासाठी मी आणि मोठा भाऊ त्याच्या मित्रांसह वानखेडे स्टेडियमला आलेलो आमची जागा नॉर्थ स्टँड मध्येच होती परत त्यांना कोणीतरी म्हटले की झालं ना मॅनेज व्यवस्थित आम्ही २५ जण होतो आणि तिकीट 24 होते सर्वांनी मला लपवून आत मध्ये नेले होते. या आज या स्टेडियमवर स्वतःचा पुतळा पाहणे अभिमानास्पद आहे. यावेळी सचिनने भारतीय संघाचे कर्णधार तंदुरुस्तीमुळे नाकारून महेंद्रसिंग धोनी कडे का सोपवले याची आठवण सांगितली.