सणासुदीचे दिवस सुरु असून यंदा दिवाळी पूर्वीच एक दिलासदायक बातमी समोर येतेय. तर सोने चांदीच्या भावात चढ-उतार सुरू असून बुधवारी चांदीच्या भावात १ हजार ४०० रुपयांनी घसरण होऊन ती ७१ हजार ६०० सहाशे रुपये प्रति किलो वर आली. तर सोन्याच्याही भावात बुधवारी 300 रुपयांची घसरण होऊन ते 61 हजार 300 रुपये प्रति तोळ्यावर आले आहे.
चार दिवसांपूर्वी सोन्याच्या भावात वाढ होऊन ते 62 हजार दोनशे रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले होते. त्यानंतर 61 हजार 300 रुपये प्रति तोळ्यावरती आली आहे. अशाच प्रकारे गेल्या आठवड्यातही 73 हजार पाचशे रुपयांवर गेलेल्या चांदीच्या भावात २६ ऑक्टोबर रोजी एक हजार रुपयांची घसरण झाली. 31 ऑक्टोबरला पुन्हा 73 हजारावर पोहोचली दुसऱ्या दिवशी एक नोव्हेंबर १४०० रुपयांची घसरण झाली व चांदी ७१ हजार सहाशे रुपये प्रति किलोभर आली आहे. सट्टा बाजारातील खरेदी विक्रीमुळे हे भाव कमी जास्त होत असल्याचे सांगितले जात आहे