साहित्य
बटाटे, मीठ, पाणी, तेल, तिखट, मीठ, चाट मसाला
कृती
सर्वप्रथम बटाटे स्वच्छ धुवून सोलून घ्या. यानंतर बटाटे जाडसर लांब कापून घ्यावेत. मग सर्व कापलेले बटाटे स्वच्छ पाण्यात धुवून घ्या.
यानंतर कढईत पाणी गरम करा नंतर पाणी गरम झाल्यानंतर त्यात मीठ घाला. मीठ घातलेल्या गरम पाण्यात स्वच्छ धुतलेले बटाट्याचे काप टाका.
लक्ष द्या, पाण्याला उकळी येऊ नये. दोन तीन मिनिटे कढईवर झाकण ठेवून बटाट्याचे काप चांगले शिजवा. त्यानंतर शिजवलेले बटाट्याचे काप सुती कापडावर टाका. कोरडे झाल्यानंतर बटाट्याचे काप मंद आचेवर लाल रंग येईपर्यंत तळून घ्या. तळलेल्या फ्रेंच फ्राइजवर चवीनुसार तिखट आणि मीठ घाला. थोडा चाट मसाला टाका आणि सर्व मिश्रण एकत्र करा. तयार आहे फ्रेंच फ्राइज.