सोने चांदीच्या भावातील चढ- उत्तर सुरूच असून 28 ऑक्टोंबर रोजी सोन्याच्या भावात ६००रुपयांची वाढ होऊन ते 62 हजार दोनशे रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले मे नंतर सोने पुन्हा एकदा 62 हजार च्या पुढे गेले आहे चांदीच्याही भावात शनिवारी आठशे रुपयांची वाढ झाली व ती 73 हजार रुपये प्रति किलोवर पोहोचली.
अमेरिकन डॉलरचे दर वधारल्याने हे भाव वाढ झाल्याचे म्हटले जात आहे. दसऱ्याच्या पूर्वीपासून सोने-चांदीच्या भावात चढ-उतार सुरू आहे. गुरुवार २४ ऑक्टोंबर रोजी सोन्याच्या भावात पाचशे रुपयांची वाढ झाली. मात्र शुक्रवारी पुन्हा दोनशे रुपयांची घसरण होऊन 61 हजार 600 रुपये प्रति तोळ्यावर आले होते. मात्र शनिवार २८ ऑक्टोबर रोजी 600 रुपयांची वाढ झाली व ते 62 हजार दोनशे रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले.
यापूर्वी 5 मे 2023 रोजी सोने 62 हजार 100 रुपये प्रति तोळ्यावर होते. तर दुसरीकडे चांदीचा ही भावांत शनिवारी आठशे रुपयांची वाढ झाल्याने तीन दिवसांवर पुन्हा एकदा 73 हजारांवर पोहोचली शनिवारी अमेरिकन डॉलरचे दर वाढवून त्यांची पण 41 रुपयांवर पोहोचले त्यामुळे सोने चांदीचा ही भावात वाढ झालेत.