उत्तरप्रदेश मधून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. सासूने आपल्याच सुनेची हत्या केल्याची घटने घडली आहे. या घटनेत सुनेचा जागीच मृत्यू झाला. स्वाती वय वर्ष ३२ असे मयत सुनेचे नाव आहे. लग्नाच्या दीड वर्षानंतर स्वाती आठ महिलांच्या गरोदर होत्या. दरम्यान सुनेची हत्या केल्यानं पोलिसांनी सासूला ताब्यात घेतलं आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, या सासू सुनेमध्ये बुधवारी काही कारणावरून भांडण झाले होते. याच रागाच्या भरात सासूने घरात असलेला दगडी वरवंटा सुनेच्या डोक्यात घातला आणि या घटनेत सून गंभीर जखमी झाली. दरम्यान तिच्या पतीने तिला तात्काळ रुग्णालयात हलवले पण उचारादरम्यान तिचा दुर्देवी मृत्यू झाला. सुनेच्या कुटुंबियांना या बद्दल माहिती मिळाल्यावर त्यांनी प्रचंड आक्रोश केला.
ती माळ्यावर चढताना शिडीवरून पडली असे सासूकडून सुनेच्या आई वडिलांना सांगण्यात आले. पण हे खोटं असून माझ्या मुलीची हत्या करण्यात आली आहे असा आरोप वडिलांनी केला. पोलिसांनी सासूला ताब्यात घेतले आहे. गरोदर आईची हत्या झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.