दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. आजचे सर्व बारा राशींचे भविष्य जाणून घ्या लाईव्ह महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून.
मेष रास
मेष राशींच्या लोकांना आजचा दिवस अनुकूल असणार आहे. आर्थिक परिस्थिती स्थिर राहील. आरोग्य चांगले राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आपल्या आहाराची काळजी घ्या
वृषभ रास
वृषभ राशींच्या मंडळींना आजचा दिवस अनुकूल असेल. कुटुंबातील सर्वांशी समन्वय ठेवा. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले निकाल मिळतील. आरोग्य चांगले राहील.
मिथुन रास
मिथुन राशींच्या लोकांना आजचा दिवस धावपळीचा असणार आहे. व्यावसायिकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी नफा-तोटा जाणून घ्यावा. आज तुम्ही सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्याल.
कर्क रास
कर्क राशींच्या लोकांना आजचा दिवस अनुकूल असणार आहे. सरकारी कामात यश मिळेल. सामाजिक उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाल्यास उत्साहाने सहभागी व्हा.
सिंह रास
आज ऑफिसची कामे थोडी सावधगिरीने करावी लागतील. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असल्याने व्यापारी वर्गाने थोडे सावध राहावे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
कन्या रास
आजचा दिवस हा सकारात्मक असेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आज चांगली बातमी मिळेल. कौटुंबिक तत्त्वे आणि मूल्ये पाळली पाहिजेत. आरोग्याच्या तक्रारी निर्माण होतील.
तूळ रास
तूळ राशींच्या लोकांना आजचा दिवस विशेष लाभ मिळवून देणारा असणार आहे. कुटुंबातील सर्वांशी तुमचे सौम्य वागणे सर्वांचे मन जिंकेल. आरोग्याची काळजी घ्यावी.
वृश्चिक रास
आज तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तीकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. मोठे निर्णय घेताना काळजी घ्या.
धनु रास
आजचा दिवस अनुकूल आहे. थोरामोठ्यांचे आशीर्वाद मिळतील. कामे वेळेवर पूर्ण होतील. घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. तब्येत चांगली राहील.
मकर रास
आजचा दिवस लाभदायी असेल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबात धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातील. प्रकृतीची काळजी घ्यावी. पथ्यपाणी सांभाळावी.
कुंभ रास
व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस नफा मिळवून देणारा असेल. एखादी मोठी ऑर्डर मिळू शकते. घरात खेळीमेळीचे वातावरण असेल. खाण्यापिण्याची चंगळ राहील.
मीन रास
आज तुम्ही सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्याल. आज तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. आज तुम्ही खरेदीसाठी जाऊ शकता. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील.