भंडारा मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सर्वत्र नवरात्र उत्साहात साजरे झाले असून आता दुर्गादेवीचे विसर्जन करण्यात येत आहे. मात्र विसर्जन दरम्यान एका युवकाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हि घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील जैतपूर येथे घडली आहे
याबाबत अधिक माहिती अशी कि, नवरात्रौत्सवात स्थापन केलेल्या शारदामातेच्या मुर्तीच्या विसर्जनासाठी गावाजवळील गावबोडी तलावात गेले होते. मंडळातील काही कार्यकर्ते तलावात उतरले असता खोल पाण्याचा अंदाज न आल्याने चेतन नागोसे वय २३ या तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला. हि घटना आज दुपारी घडली. सदर घटनेची माहिती मिळताच दिघोरी- मोठी पोलिस स्टेशनला देण्यात आली आहे.