संध्याकाळी भूक लागल्यावर काहीतरी वेगळे खायला हवे असते. पण वेगळे काय करायचे हा प्रश्न पडतो. तर अशावेळी तुम्ही बटाटा ट्रँगल्स करू शकता. बटाटा ट्रँगल्स घरी कसे बनवायचे हे जाणून घ्या लाईव्ह महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून.
साहित्य
उकडलेले बटाटे, साबुदाणे पीठ, हिरवी, मिरची, जिर, मीठ, तेल
कृती
सर्वप्रथम, साबुदाणे मिक्सरमधून वाटून घ्यावेत. उकडलेले बटाटे बारीक किसून घ्यावे. यानंतर किसलेल्या बटाट्यात बारिक चिरलेली हिरवी मिर्ची, जिर आणि चवीनुसार मीठ घालावे. त्यानंतर हे सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आहे. त्यानंतर साबुदाणे पीठ एकत्र मळुन त्याचा घट्ट असा गोळा करून घ्यायचा आहे. नंतर पोळी पाट वर हा गोळा ठेवून त्यावर १ चमचा तेल टाकून लाटून किंवा थालीपीठ प्रमाणे एकसामान करून घ्यावा.
त्यानंतर सुरीच्या साहाय्याने लाटलेली पोळी ही ट्रँगल्स/त्रिकोनि आकारात कापून घ्यावी. त्यानंतर तेल गरम करून कमी गॅस फ्लेमवर तळून अथवा श्यालोफ्राय करुन घ्यावे . तयार आहे बटाटा ट्रँगल्स.