दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. आजचे सर्व बारा राशींचे भविष्य जाणून घ्या लाईव्ह महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून.
मेष रास
आज खर्चात वाढ होईल. मुलांकडून सुवार्ता समजतील. व्यवसायात नफा होईल. एखाद्याशी बोलताना तुमच्या बोलण्याकडे लक्ष द्या. तब्येतीची काळजी घ्यावी.
वृषभ रास
आजचा दिवस वृषभ राशींच्या लोकांसाठी संमिश्र पद्दतीचा असणार आहे. आज धनलाभ होण्याचा योग आहे. आज तुमची सर्व कामे वेळेवर पूर्ण होतील. नवीन संधी मिळतील.
मिथुन रास
मिथुन राशींच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. नोकरीत सहकाऱ्यांचे मार्गदर्शन मिळाल्याने कामे वेळेवर पूर्ण होतील. खाण्यापिण्याची चंगळ राहील. आरोग्य चांगले राहील.
कर्क रास
आज तुमचा दिवस अनुकूल असेल. राजकारणाशी संबंधित लोकांसाठी दिवस शुभ आहे. आज कौटुंबिक सुख आणि शांती लाभेल. अनावश्यक खर्च होणार नाही याची काळजी घ्यावी.
सिंह रास
सिंह राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. नोकरीत अतिरिक्त जबाबदारी स्वीकारावी लागेल त्यामुळे कामाचा ताण राहील. खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करू नये.
कन्या रास
आज तुम्हाला कुटुंबाकडून चांगली बातमी मिळेल. नोकरी मध्ये नवीन कामासाठी आपला विचार केला जाईल. आवडते खाद्यपदार्थ खायला मिळतील. थोरामोठ्यांचा आशीर्वाद मिळेल.
तूळ रास
तूळ राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल असेल. नोकरीत आपले वर्चस्व राहील हाती घेतलेल्या कामांमध्ये यश मिळेल. तब्येत ठणठणीत राहील.
वृश्चिक रास
वृश्चिक राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल असेल. नियोजित कामे वेळेआधीच पूर्ण होतील आणि तुम्हाला स्वतः साठी वेळ काढता येईल. कुटुंबासोबत बाहेर जाण्याचा योग आहे.
धनु रास
धनु राशींच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. व्यवसायात भरभराट होईल. आज तुम्ही काही धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.
मकर रास
आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम राहील. आज उत्तम मनोबलामुळे तुमचे काम चांगल्या गतीने होईल. ऑफिसमध्ये तुमची सर्जनशीलता चांगली असेल. आई-वडिलांसोबत काही धार्मिक स्थळी जाण्याची शक्यता आहे.
कुंभ रास
आजचा दिवस विशेष लाभदायक असू शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळून आर्थिक स्थिती मजबूत होईल. या राशीच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे, तब्येत चांगली राहील.
मीन रास
आज तुम्ही मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असाल. लक्ष एकाग्र करून काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आज तुम्ही जुन्या मित्रांना भेटू शकता. घरात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल.