जवळपास सगळ्यांनाच पुलाव आवडतो. पुलाव तुम्ही घरी सुद्धा बनवू शकता. पुलाव घरी बनवायला सुद्धा खूप सोप्पं आहे. तर शाही पुलाव घरी कसा बनवला जातो हे जाणून घ्या लाईव्ह महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून.
साहित्य
तांदुळ, पनीर, बटाटा, कांदा, फ्लॉवर, मटार, काजू, गाजर, मिरे, दालचिनी, तमालपत्र, मीठ, तेल, पाणी
कृती
सर्वप्रथम, तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवा. सर्व भाज्या धुवून बारीक चिरून घ्याव्यात, यानंतर पनीर तळून घ्या. नंतर एका कढईत तेल गरम करा आणि कांदा परतून घ्या. त्यात तेज पान आणि इतर सर्व मसाले चांगले परतून घ्या. त्यात सर्व भाज्या टाका आणि चवीनुसार मीठ टाका. त्यात मिरे पावडर टाका
नंतर पाणी टाका आणि नंतर तांदूळ टाका तांदूळ शिजले की तुमचा शाही पुलाव तयार आहे.