साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या विजयादशमीच्या पूर्वसंख्येला सोने 200 रुपयांनी स्वस्त होत 61 हजार चारशे रुपये प्रति तोळ्यावर तर चांदीच्या भावात 500 रुपयांची घसरण होऊन ती 73 हजार पाचशे रुपये प्रति किलो वर आली यामुळे विजयादशमीला सोने लुटण्याची सुवर्णसंधी साधली जाणार आहे.
जळगावसह संपूर्ण देशभरात अनेक ग्राहक सोने खरेदी करत असल्याने सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणत वाढली असून सोने 62 हजार रुपयांपर्यंत तर 75 हजार रुपये प्रति किलो पर्यंत चांदीचे दर दिवाळीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. पश्चिम आशियातील युद्ध संकटामुळे जगभरातील बाजार कोसळले असून त्याचा फटका भारतीय बाजारालाही बसला.
भारतीय शेअर बाजार सोमवारी 825 अंकांनी कोसळल्यामुळे गुंतवणूकदारांचे तब्बल आठ लाख कोटी रुपये बुडाले आहेत. सण तसेच लग्नसराईमुळे देशभरात मागणीत वाढ होते इस्त्राईल आणि हमास युद्ध वाढत जाण्याची भीती. तसेच अमेरिका व्याज दरात वाढ करणे थांबविण्याची आशा. शेअर बाजारातील घसरणीमुळे सोन्याला भाव ह्या कारणांनी सोन्याच्या किमती वाढणार आहेत.