बांग्लादेशमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बांगलादेशमध्ये दोन रेल्वे एकमेकांना धडकल्या असून यात कमीतकमी वीस लोकांचा मृत्यू झाला आहे. हे प्रवासी आणि मालवाहतूक रेल्वे एकमेकांना धडकल्याची माहिती आहे. राजधानी ढाका जवळ कृष्णगंज जिल्ह्यातील ही घटना आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी आहे कि, प्रवासी रेल्वे कृष्णगंज ते ढाका येथे जात होती त्यावेळी हा भीषण अपघात झाला. या अपघातात २० जणांचा मृत्यू झाला असून मृत्यूची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हा अपघात दुपारी साडेतीनच्या दरम्यान झाला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले असून मदतकार्य सुरु झाले आहे.
जखमींना जवळच्या ह़ॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अनेकांची स्थिती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान हा अपघात कसा झाला याबाबत अधिक माहित मिळाली नाही.