टाकरखेडे ता.एरंडोल येथे जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात रोटरी क्लब जळगाव वेस्ट यांच्या संकल्पनेतून व ग्रामपंचायत यांच्या अनमोल सहकार्याने संपूर्ण गावातील लोकांची महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी गावातील सर्व लोकांची जनरल,नेत्र,दंत,नाक,कान, घसा,हाडांची तपासणी, लहान बालक व स्रियांचे विविध आरोग्यविषयक समस्या यांची तपासणी करण्यात येऊन गरजेनुसार मोफत औषधींचे वितरण करण्यात आले.
तसेच ज्यांना पुढील उपचाराची गरज असेल त्यांना सवलतीच्या दरात उपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहे.यावेळी हिमोग्लोबिनची तपासणी करून 106 ब्लड सॅम्पल गोळा केले. तसेच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून त्यांचा रक्तगट देखील तपासण्यात आला.यावेळी जळगावातील नामांकित डॉ.राजेश पाटील,डॉ.गिरीश नारखेडे,डॉ. सुशिल राणे,डॉ.आनंद दसपुत्रे, डॉ.चेतना पाटील,डॉ.दर्शना शहा,डॉ.कल्पेश गांधी,डॉ.नेहा भंगाळे,डॉ.मोनिका जाधव,डॉ.प्रीती भारुळे, डॉ.रोहिणी देशमुख, डॉ.प्रतीक सुखासे,डॉ.समीक्षा वानखेडे,डॉ.सचिन इंगळे व डॉ.सोनल इंगळे या तज्ञ डॉक्टरांची टीम व पॅथॉलॉजीच्या डॉ.शिल्पा टोके ,औषधी वाटपासाठी फार्मासिस्ट श्री. योगेश राका,श्री. अमित चांदीवाल,श्री. सुदाम वाणी,श्री.स्वप्निल पाटील,रक्त तपासणीसाठी रेडक्रॉसचे मंगेश पाठक,कामरा शेख,जमील खान यांची उपस्थित होती.
या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन रोटरी क्लब जळगाव वेस्टच्या अध्यक्षा श्रीमती.सरिता खाचणे,सचिव श्रीमती.मुनिरा तरवारी,श्री.सुनील सुखवानी,श्री.महेश सोनी,श्री.गौरव सफले,श्री.देवेश कोठारे, श्री.शंतनू अग्रवाल,श्री.परिमल मेहता,श्री.संदीप भोळे,श्री.भद्रेश शहा,श्री.स्मिता बंदुकवाला,श्री.एस.एन.देसाई,श्री.नितीन रेदासनी,श्री.तुषार तोतला,श्री.कौशल जोशी,श्री.निखिल बियाणी,श्री.नेमिष शहा,श्री.हकीम बुटवाला,श्री.योगेश भोळे,श्री.बिपीन काबरा,श्री.हितेश मंडोरा,श्री.चंदू सत्रा,श्री.केकल पटेल,श्री.कृष्णकुमार वाणी यांनी केले.कार्यक्रमाच्या मदतीला रोट्रॅक्ट खुशाल चौधरी,मधुरा भोपे,देवांशी कोठारी,प्रथमेश भंगाळे,प्रेम मराठे,वालेचा मुस्कान,तन्वी वालेचा,धनंजय केजरीवाल,मोहित शामनानी,प्रतिक वाणी,ऋषिकेश रावेरकर,वैभव आखोटी,कनिष्क खोब्रागडे,मंदार कासार,निधी कोठारी,हेक्टर(फ्रान्स),पेअर द वनदे(फ्रान्स) उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गावाचे सरपंच श्री.प्रविण पाटील,ऍड.श्री.शरद पाटील,उपसरपंच श्रीमती.सिमाताई कोळी,तंटामुक्ती अध्यक्ष श्री. संदीप पाटील,माजी उपसरपंच श्री. सुनील पाटील,श्री.निवृत्ती कोळी,श्री.वसंत पाटील,ग्रा.प.सदस्य देवकाबाई जाधव श्रीमती. योजनताई पाटील,श्रीमती.चापाबाई वाघ,ग्रामसेवक श्री. हर्षल शिरसाठ,श्री. सुधाकर पाटील,श्री.अंकुश पाटील,श्री.विश्वास पाटील,श्री. जयपाल कांबळे,निमा नाईक,भीमा वसावे,रविता वसावे,विनिता बारेला,पिंकी पावरा,होना वळवी,श्री.एकनाथ पाटील, श्री.भुषण पाटील,शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती.माधुरी देसले,उपशिक्षिका श्रीमती. ज्योती पाटील, उपशिक्षक श्री. भरत सूर्यवंशी,उपशिक्षक श्री. गणेश महाजन,अंगणवाडी सेविका श्रीमती. प्रतिभा पाटील,मदतनीस श्रीमती.रत्नाबाई नंनवरे ,आशासेविका सौ.सुरेखा पाटील,शा.व्य. स.अध्यक्ष श्री. चंदू मालचे, श्री. सुनील पाटील,श्री. विष्णू बाविस्कर,श्री.सोपान पाटील,श्री. प्रवीण पाटील भावेश पाटील,चंद्रकांत थोरात,अभिजीत पाटील,जयेश पाटील,अविनाश पाटील,रोहन पाटील,किरण संजय पाटील यांनी प्रयत्न केले.
न भूतो न भविष्यती कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल गावाचे सरपंच व संपूर्ण टीम तर्फे रोटरी क्लब जळगाव वेस्टच्या टीमचे सन्मान करण्यात आला