नवरात्रीचा उपवास पूर्ण नऊ दिवस केला जातो. भाविक पूर्ण भक्तिभावाने नवरात्रीचे उपवास करत असतात. उपवासाला साबुदाणा, साबुदाणा वडा, यासारखे पदार्थ खाल्ले जातात. पण सारखं तेच तेच खाणं कंटाळवाणं झालं असेल तर तुम्ही उपवासाची मिसळ सुद्धा घरी करू शकतात. उपवासाची मिसळ घरी कशी बनवली जाते हे जाणून घ्या लाईव्ह महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून.
साहित्य
शेंगदाणे, साबुदाणा, मिरच्या, जीरे, दही बटाटा भाजी, फराळी चिवडा, मीठ, तूप
कृती
उपवासाची मिसळ’ बनवण्यासाठी सर्वात आधी साबुदाण्याची खिडची करुन घ्यावी. शेंगदाणे, मिरची, मीठ वाटून त्याची आमची बनवून घ्यावी. आमटीला तूप आणि आमसूलाची फोडणी घालावी. एका मोठ्या भांड्यात खिचडी. बटाटा भाजी आणि शेंगदाण्याची आमटी एकत्र करावी. त्यावर गोडसर दही, फराळी चिवडा आणि भाजलेले शेंगदाणे घालावे.