जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये नवीन मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. इंडियन ऑइलमध्ये 1720 पदांवर भरती होणार असून यासाठी नोंदणी 21 ऑक्टोबर 2023 पासून सुरू झाली आहे.अर्ज करण्यासाठी किमान वयोमर्यादा 18 वर्षे आणि कमाल वयोमर्यादा 24 वर्षे आहे. नियमानुसार SC/ST/OBC (NCL) /PWD उमेदवारांसाठी वयात सवलत लागू आहे. तर या भरती साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे तसेच यासाठी अर्ज कसा करावा हे जाणून घ्या लाईव्ह महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून.
ट्रेड अप्रेंटिस – अटेंडंट ऑपरेटर (केमिकल प्लांट) – केमिकल ४२१ पदे, ट्रेड अप्रेंटिस (फिटर) – मेकॅनिकल 189 पदे, ट्रेड अप्रेंटिस (बॉयलर) – मेकॅनिकल 59 पदे, तंत्रज्ञ शिकाऊ – रसायन 345 पदे, तंत्रज्ञ शिकाऊ – मेकॅनिकल 169 पदे, तंत्रज्ञ शिकाऊ – इलेक्ट्रिकल 244 पदे, तंत्रज्ञ अप्रेंटिस इन्स्ट्रुमेंटेशन 93 पदे
ट्रेड अप्रेंटिस सचिवीय सहाय्यक 79 पदे, ट्रेड अप्रेंटिस अकाउंटंट 39 पदे, ट्रेड अप्रेंटिस डेटा एंट्री ऑपरेटर (फ्रेशर अप्रेंटिस) ४९ पदे, ट्रेड अप्रेंटिस डेटा एंट्री ऑपरेटर (कौशल्य प्रमाणपत्र धारक) 33 पदे.
या पदांसाठी शैक्षणिक पात्रता अशी आहे कि अर्ज करण्यासाठी, तुमच्याकडे संबंधित विषयातील 10वी/12वी/ITI/डिप्लोमा असणे आवश्यक आहे. Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 नोव्हेंबर 2023 हि आहे.