नवरात्रीत भाविक उपवास करत असतात. संपूर्ण नऊ दिवस भाविक भक्तिभावाने उपवास करतात. उपवासाला साबुदाणा खिचडी, भगर, राजगिऱ्याचे लाडू असे पदार्थ खाल्ले जातात. पण तुम्हाला उपवासाला काही वेगळं खावंसं वाटत असेल तर दह्यापासून बनवलेली थंडगार लस्सी उपवासाला पिऊ शकता. लस्सी घरी कशी बनवायची हे जाणून घ्या लाईव्ह महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून.
साहित्य
दही, दह्याची साय, दुध, साखर, सुका मेवा
कृती
सर्वप्रथम, घट्ट दहीमध्ये दुध घालावे त्यामध्ये साखर घालावी आणि मिक्समध्ये घुसळून घ्यावे. हे सर्व मिश्रण ग्लासमध्ये भरावे आणि त्यावर दह्याची साय टाकावी.
आवडीनुसार सुका मेवा टाकावा आणि केशर घालावी. तयार आहे थंडगार लस्सी.