जळगाव. कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व महाराष्ट्र सायबर सेल आणि क्विक हिल फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 20th ऑक्टोबर रोजी सायबर सुरक्षा जनजागृती महीण्याच्या अनुषंगाने नाटीका, पोस्टर विविध प्रकार जनजागृती करण्यात आली.
विद्यापीठातील संगणकशास्त्र प्रशाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून समन्वयक राजु आमले यांचा मार्गदर्शनाखाली नाटीका, पोस्टर प्रेजेंटेशन, Quiz competition इ. स्पर्धांचे आयोजन करून यशस्वीरीत्या पार पाडले.
त्यावेळी विद्यार्थ्यांनी विद्यापीठ परीसरात फिरून संपूर्ण शिक्षक, कर्मचारी व सुरक्षा रक्षक यांना सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करून माहीती पुस्तीका download करून दिली.
कार्यक्रमात स्वयंसेवक गायत्री ठाकरे, श्रेया भोंबे, कुणीका बैरनार, दर्शना हिरे, तेजल कोल्हे अंशीका गुप्ता व राजश्री कापुरे यांनी फोटो मॉर्फिंग या fraud वर नाटिका सादर केली.