जेवताना आपल्याला काहीतरी तोंडी लावायला हवं असत. म्हणजे लोणची, चटणी, पापड, कोशिंबीर यासारखे पदार्थ तोंडी लावायला हवे असतात. पण तुम्हाला माहित आहे का? काकडी कांद्याचे स्वादिष्ट रायते सुद्धा तुम्ही तोंडी लावायला करू शकता. काकडी कांद्याचे स्वादिष्ट रायते घरी कसे बनवले जाते हे जाणून घ्या लाईव्ह महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून.
साहित्य
काकड्या, कांदे, दही, हिरव्या मिरच्या, लाल तिखट, मिरेपूड, जिरेपूड, साखर, मीठ, कोथिंबीर
कृती
सर्वप्रथम, काकड्या व कांदे सोलून घ्या आणि बारीक चिरुन घ्या. दही चांगल्याने घुसळून घ्या. मिरच्या उभ्या चिरा. दह्यात बारीक चिरलेले पदार्थ टाका.
त्यात तिखट, साखर आणि चवीनुसार मीठ टाका. सर्व मिश्रण एकजीव करा आणि या मिश्रणात वरुन जिरेपूड, मिरेपूड आणि वरुन कोथिंबीर घाला. काही वेळ हे रायते फ्रीजमध्ये ठेवा.