झारखंड मधून एक मन सुन्न करणारी बातमी समोर येत आहे. पिकनिकला गेलेल्या ६ मित्रांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हे सर्व विद्यार्थी बारावीच्या वर्गात शिकत होते.
याबाबत अधिक माहिती अशी कि, या मुलांना पाण्यात पोहण्याचा मोह आवरला नाही. आधी दोन विद्यार्थी धरणात उतरले आणि थोड्याच वेळात बुडू लागले. हे पाहून इतर मित्रांनी त्यांना वाचवण्यासाठी धरणात उड्या मारल्या. मात्र काही मिनिटातच सहा मित्र धरणात बुडाले, त्यातील एक जण वाचला आहे. शाळेतील मुखाध्यापकांनी सांगितल्यानुसार हे सर्व विद्यार्थी मंगळवारी सकाळी शाळेच्या गणवेशात घरातून बाहेर पडले. पण वर्गात न जाता सर्वजण धरणावर फिरायला गेले. त्या दिवशी वर्गात जवळापास १६-१७ जण अनुपस्थित होते.
जनीश पांडे, सुमित कुमार, मयंक सिंग, प्रवीण गोप, इशान सिंग आणि शिवसागर सिंग अशी मृतांची नावे आहेत. या सर्वांचे वयोवर्ष १७ ते १८ असल्याची माहिती मिळत आहे. या घडलेल्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.