अल निनोचा वाढता प्रभाव आणि सततचा खंड यामुळे देशात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद होत मान्सूनने चार दिवस उशिराने निरोप घेतला. पाऊस कमी झाल्याने राज्याची चिंता वाढली आहे. दरवर्षी मान्सून १५ ऑक्टोबरपर्यंत मान्सून संपूर्ण देशातून माघार घेतो. यंदा चार दिवस गुरुवारी तो परतला.
महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण ११ टक्क्यांनी घेतले असून, काही ठिकाणी दुष्काळसदृश परिस्थिती आहे. राज्यात सरासरीच्या ८८.६ इतका पाऊस झाला असून पावसाचे प्रमाण ११. ४ टक्क्यांनी घटले आहे. याचा परिणाम राज्यातील पाणीपुरवठा आणि उत्पादनावर होणार आहे. या वर्षी नेहमीपेक्षा आठ दिवस उशिरा २५ सप्टेंबरच्या मान्सूनने परतीचा प्रवास सुरु केला होता. यंदा मान्सून १९ ऑक्टोबर रोजी देशाच्या उर्वरित भागातून बाहेर पडला आहे. असे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.
राज्यात ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाचा दिलासा मिळेल असा अंदाज होता मात्र कोकण वगळता अन्य ठिकाणी परतीचा पाऊस झाला नाही. या महिन्यात सरासरी १९ मिमी इतकाच पाऊस झाला आहे.