नवरात्रीत नऊ दिवस अनेक जण अगदी भक्तिभावाने उपवास करतात. काहीजण तर निर्जळी किंवा काहीजण उपवासाचे पदार्थ खाऊन उपवास करतात. उपवासाचे पदार्थ म्हणजे साबुदाणा खिचडी, भगर, असे पदार्थ खाल्ले जातात. पण राजगिऱ्याचे थालीपीठ तुम्ही उपवासाला बनवून खाऊ शकतात. अगदी सोप्पी अशी याची रेसिपी आहे. राजगिऱ्याचे थालीपीठ घरी कसे बनवले जाते हे जाणून घ्या लाईव्ह महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून.
साहित्य
राजगिऱ्याचं पीठ, बटाटे, मिरच्या, शेंगदाण्याचा कूट,आल्याची पेस्ट, कोथिंबीर, मीठ
कृती
सर्वप्रथम, एका भांड्यात राजगिऱ्याचं पीठ घ्यावे. यामध्ये किसून घेतलेले बटाटे टाका. यानंतर त्यामध्ये कोंथिबीर, शेंगदाण्याचा कूट, मिरच्या आणि एक चमचा आल्याची पेस्ट टाका. आता यामध्ये चवीनुसार मीठ घेऊन सर्व राजगिऱ्याच्या पिठात मिक्स करा. त्यानंतर थोड पाणी घालून हे सर्व मिश्रण चांगल्याप्रकारे घट्ट मळून घ्या. मग तुम्ही थालीपीठचा गोळा पोळपाटावर थापून घ्या. यानंतर थालीपीठ तव्यावर गरम तेलात मस्त भाजून घ्या. तयार आहे राजगिऱ्याचे थालीपीठ