जवळपास सगळ्यांनाच पराठा आवडत असतो. म्हणजे मेथी पराठा, आलू पराठा, चीझ पराठा, हे आवडणारे पराठे आहेत. पण तुम्ही कधी पनीर पराठा ट्राय केला आहे का नसेल केला तर पनीर पराठा आजच घरी करून पहा. पनीर पराठा घरी कसा बनवायचा हे जाणून घ्या लाईव्ह महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून.
साहित्य
पनीर, गव्हाचे पीठ, लाल तिखट, हिरवी मिरच्यांची पेस्ट, बारीक चिरलेला कांदा, आले, कोथिंबीर, धनेपूड, जिरेपूड, हळद, तेल, तूप, लिंबूचा रस, मीठ
कृती
सर्वप्रथम, सुरुवातीला पनीर बारीक किसून घ्यावे. त्यात लाल तिखट, हिरव्या मिरच्यांची पेस्ट, हळद, मीठ टाकावे. बारीक चिरलेला कांदा त्यात टाकावा
धनेपूड, जिरेपूड आणि लिंबाचा रस त्यात टाकावा. वरुन कोथिंबीर टाकावी आणि हे सर्व मिश्रण एकजीव करावे. गव्हाचे पीठ पाण्याने भिजवावे त्यातचवीनुसार मीठ टाकावे. आणि कणिक मळून घ्यावी.
पोळी लाटल्यानंतर त्यात वरील मिश्रण भरावे आणि त्याचा गोळा करावा. हलक्या हाताने पराठा लाटून घ्यावा. गरम तव्यावर तूप किंवा तेल सोडून पराठा दोन्ही बाजूने चांगला भाजून घ्यावा. तयार आहे पनीर पराठा.