मुंबईः वृत्तसंस्था राज्यात शिंदे सरकार आल्यानंतर कॅबिनेटमंत्री पदाचा शपथविधी झाल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला महाविकास आघाडीतर्फे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आक्रमक आंदोलन करण्यात आलं. 50 खोके, एकदम ओक्के सरकारचा धिक्कार असो. गद्दारांच्या सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. यावर एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांची तसेच भाजप नेत्यांची काय प्रतिक्रिया आहे, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होत. विधान भवनात पोहोचलेल्या गिरीश महाजनांनी यावर प्रतिक्रिया दिली. आंदोलन आणि घोषणाबाजी करणारे सगळे सध्या चौकशीच्या फेऱ्यांमध्ये अडकले आहेत. त्यामुळे त्यांची अवस्था अत्यंत केविलवाणी झाली आहे. जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी ते अशा प्रकारे घोषणाबाजी करत असल्याचं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलंय गिरीश महाजन काय म्हणाले?…
Author: editor desk
गोंदिया : वृत्तसंस्था गोंदिया येथे मंगळवारी रात्री अडीच वाजेच्या सुमारास रेल्वेचे तीन डबे रुळावरून घसरले. या अपघातात ५० पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. मालगाडी आणि पॅसेंजर ट्रेन यांच्यात झालेल्या धडकेने हा अपघात झाला. कोणत्याही प्रवाशाचा मृत्यू झाल्याचे वृत्त नाही. ही ट्रेन छत्तीसगडमधील बिलासपूरहून राजस्थानमधील जोधपूरला जात होती. गाढ झोपेत होते प्रवासी अपघात झाला तेव्हा ट्रेनमधील बहुतांश प्रवासी गाढ झोपेत होते. धडक होताच एकच खळबळ उडाली आणि प्रवासी ट्रेनमधून उतरले. त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान, भगत की कोठी स्थानकावरून सिग्नल न मिळाल्याने अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे. तीन तासांनंतर रेल्वे वाहतूक पुन्हा सुरू अपघातानंतर पहाटे 4.30 वाजता…
बीड : वृत्तसंस्था शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटे यांचं १४ रोजी पहाटे अपघाती निधन झालं. हा अपघात घडल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. त्यानंतर खुद्द विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी अपघाताच्या त्या दोन तासात काय झालं? याची चौकशी केली पाहिजे, अशी मागणी केली होती. अशातच आता सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप व्हायरल केली जात आहे. या ऑडिओ क्लिपमधील आवाज विनायक मेटेंच्या अपघातापूर्वी त्यांच्यासोबत असलेले आणि त्यांचे निकटवर्तीय अण्णासाहेब मायकर यांचा असल्याचा दावा केला जात आहे. या ऑडिओ क्लिपमधून तीन ऑगस्टला सुद्धा मेटे यांच्या गाडीला अपघात करण्याचा प्रयत्न केला गेल्याचा दावा केला जात आहे. याप्रकरणानंतर ज्योती मेटे यांनी स्वतः…
जळगाव : प्रतिनिधी युवासेना प्रमुख तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचा काही दिवसाआधी जळगाव जिल्हा दौरा तब्येत खराब झाल्याने स्थगित करण्यात आला होता. पण आता पुन्हा २० ऑगस्ट रोजी जिल्हात येणार असून त्यांच्या दौर्याचा अधिकृत तपशील जाहीर करण्यात आला आहे. शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून आदित्य ठाकरे हे जळगाव जिल्हा दौर्यावर येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र आदल्या दिवशी अचानक त्यांची प्रकृती खराब झाल्यामुळे हा दौरा स्थगित करण्यात आला होता. यानंतर आता त्यांचा दौरा नव्याने जाहीर झाला असून ते शनिवार दिनांक २० ऑगस्ट रोजी जळगाव जिल्ह्यात येत आहेत. अधिकृत दौर्यानुसार आदित्य ठाकरे यांचे सकाळी १०.४० वाजता विमानतळावर आगमन होणार आहे. यानंतर…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था शिवसेनेच्या धनुष्यबाण या पक्ष चिन्हाबाबत निवडणूक आयोग सुनावणी घेण्याची भीती उद्धव ठाकरेंना असल्यानं त्यांनी पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. या सुनावणीवर आज कोर्टात सुनावणी पार पडली. शिवसेनेच्या या भीतीवर सुप्रीम कोर्ट निरिक्षण नोंदवणार आहे. त्यामुळं उद्धव ठाकरे गटासाठी हा दिलासा मानला जात आहे. सुप्रीम कोर्टात उद्धव ठाकरे गटाच्या भीतीवर निरिक्षण नोंदवणार असलं तरी यापूर्वीच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगानं यासंदर्भत कोणताही निर्णय घेऊ नये, असं म्हटलं होतं. त्यामुळं निवडणूक आयोगाकडून असा प्रकारचा निर्णय घेतला जाणार नाही, असं ज्येष्ठ विधीज्ञ उज्वल निकम यांनी म्हटलं आहे. त्यामुळं शिवसेनेला वाटत असलेली भीती ही अनाठायी असल्याचं त्यांचं मत आहे.…
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात रोहिणीताई खडसे-खेवलकर यांनी जनसंवाद यात्रेच्या रूपाने फार मोठे पाऊल उचलले असून या उपक्रमाचा फायदा आगामी सर्व निवडणुकांत राष्ट्रवादी काँग्रेसला होईल. या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. भर पावसात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची जमलेली मोठी गर्दी हाच माझ्यासाठी फार मोठा सत्कार आणि सन्मान आहे, असे प्रतिपादन करुन आ. अनिल पाटील यांनी केले. ज्यांच्या शब्दाने निवडून आले अशा पवार साहेबांना जो झाला नाही, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा जो झाला नाही तो सामान्य कार्यकर्त्यांना काय होणार?असे सांगून, “पलटी मारणारा माणूस” आ.चंद्रकांत पाटील असल्याची टीका देखील यावेळी आमदार पाटील यांनी केली. स्वातंत्र्यदिन १५…
श्रीनगर : वृत्तसंस्था जम्मू काश्मीरमधून मोठी बातमी समोर आली आहे. काश्मीरच्या पहलगाम येथील चंदनवाडी परिसरात जवानांची एक बस दरीमध्ये कोसळली. पहलगामच्या बेताब खोऱ्यात ही दुर्घटना घडली. या बसमध्ये 39 जवान होते. दुर्घटनेत अनेक जवानांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. ITBP ने दिलेल्या माहितीनुसार, 39 कर्मचारी (ITBP मधील 37 आणि JKP मधील 2) घेऊन जाणारी सिव्हिल बस रस्त्याच्या कडेला असलेल्या नदीच्या पात्रात कोसळली. बसचे ब्रेक फेल झाल्याने ही दुर्घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. हे जवान चंदनवारीहून पहलगामकडे निघाले होते. प्रकरणात घातपाताची भीती व्यक्त केली जात आहे. आयटीबीपीच्या वाहनाच्या अपघातात सहा जवानांच्या मृत्यूची पुष्टी झाल्याचे बचाव पथकाच्या पथकांनी सांगितले आहे. मृत…
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील झूरखडे येथे अज्ञात चोरट्याने धाडसी घरफोडी करत तब्बल 2 लाख 16 हजारांचा अवस्था लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, नारायण चौधरी (वय ६०) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,दि. ११ ऑगस्ट रोजी दुपारी २ ते दि. १४ ऑगस्ट २०२२ रोजीच्या सकाळी ११.३० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने झुरखेडा गावातील बंद घराच्या दरवाजाचा कोंडा तोंडुन घरात प्रवेश केला.त्यानंतर घरातील २ लाख १६ हजार १०० रुपये किंमतीचे सोने-चांदीचे दागीने व रोख रुपये लंपास केला आहे. तसेच गावशेजारील निमखेडा बस स्टॅड जवळील भगवान ज्ञानेश्वर पाटील यांचे मनिष…
वरणगाव : प्रतिनिधी येथून जवळच असलेल्या केंद्रशासित युद्ध साहित्य व सामुग्री निर्माण करणाऱ्या कारखान्यातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये किरकोळ कारणांवरून हाणामारी झाली. मात्र एकाने वरिष्ठ अधिकाऱ्याच्या डोक्यात व हातावर टेबलावरील पेपरवेटने जीवघेणा हल्ला केल्याने जखमी अधिकाऱ्याने वरणगाव पोलिसांत गुन्हा दाखल केला असून, संशयितास पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे. सविस्तर वृत्त असे की, वरणगाव आयुध निर्माणीत येथील केंद्र सरकारच्या युद्ध साहित्य व सामग्री निर्माण कारखान्यात रविवारी (ता. १४) सकाळी अकरादरम्यान फिर्यादी आयुध निर्माणी वरणगावचे जॉइंट जीएम शैलेश रामचंद्र पाटील (वय ५१, रा. रेणुकानगर, वरणगाव) हे आयुध निर्माणीत कर्तव्यावर असताना संशयित अमृत पाल (एजीएम, आयुध निर्माणी वरणगाव) (रा. रेल्वे ऑफिसर कॉलनी, भुसावळ) हे…
अमळनेर : प्रतिनिधी चोपडाहुन नाशिककडे जाणाऱ्या बसला दुचाकीस्वारने जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील तरुण जागीच ठार झाल्याची घटना १५ ऑगस्ट रोजी दुपारी घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चोपड्याहून नाशिककडे निघालेल्या बस क्र.MH-40 , Y-5977 सावखेडा चौफुली पासून काही अंतरावर १५ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास पातोंडा रोडवर समोरून येणाऱ्या बसला चोपड्याकडे जात असलेला तरुण मनोज पाटील हा जागीच ठार झाला आहे. पारोळा तालुक्यातील टोळी येथील रहिवासी मनोज युवराज पाटील हा तरुण मोटारसायकलने चोपडाच्या दिशेने जात होता. तरुण जागीच ठार झाला. अपघात इतका भीषण होता की मोटारसायकल शंभर मीटरपर्यंत फरफटत जाऊन तीचे पार्ट वेगवेगळ्या ठिकाणी पडून मोटारसायकल क्षणार्धात जळून खाक झाली होती. बसमधील…

