Author: editor desk

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भाजपा संसदीय मंडळ आणि केंद्रीय निवडणूक समितीच्या पुनर्रचनेत पक्षाने माजी अध्यक्ष, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना वगळलं आहे. त्याचवेळी निवडणूक समितीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संधी देत भाजपाने त्यांना पदोन्नती दिली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसनेही यावर प्रतिक्रिया देताना भाजपावर टीका केली असून, गडकरींची राजकीय उंची वाढत असल्याचं हे चिन्ह असल्याचे म्हटलं आहे. क्लाईड क्रास्टो यांचं ट्वीट – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी ट्वीट केलं असून, नितीन गडकरी यांचा भाजपाच्या संसदीय मंडळात समावेश न होणं एक चतुर राजकारणी म्हणून त्यांचा दर्जा खूप वाढला असल्याचं दर्शवत असल्याचं म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय राजकारणात? यावेळी त्यांनी…

Read More

धरणगाव (प्रतिनिधी) : देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत १७ रोजी धरणगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकातील 75 फुटी तिरंगा ध्वजा जवळ सामूहिक राष्ट्रगीत गायन करण्याचे आयोजन करण्यात आलेले होते. शासन निर्देशानुसार जास्तीत जास्त नागरिकांना या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचे आवाहन नगरपरिषद मार्फत करण्यात आलेले होते.त्यानुसार शहरातील सर्व शाळा या कार्यक्रमात सहभागी झालेल्या होत्या. १०.५८ मिनिटांनी नगरपरिषदेने सायरन वाजवून ठीक ११.०० वाजता सर्व नागरिक, विद्यार्थ्यांनी सामूहिक राष्ट्रगीत गायन केले. यावेळी धरणगाव नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी जनार्दन पवार,सर्व शासकीय विभागांचे अधिकारी शहरातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, व विध्यार्थी – विद्यार्थिनी, पत्रकार, प्रतिष्ठित व्यक्ती, व्यापारी – व्यावसायिक यांच्यासह नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या…

Read More

जळगांव (जिमाका वृत्तसेवा)  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वराज्य महोत्सवातंर्गत आज सकाळी ११ वाजता ‘समूह राष्ट्रगीत गायन’ जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडले. यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, जिल्हा पुनर्वसन अधिकारी रवींद्र भारदे, शुभांगी भारदे, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी, रोहयो उपजिल्हाधिकारी प्रसाद मते, उपजिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे तसेच तहसीलदार सुरेश थोरात, पंकज लोखंडे, महेंद्र माळी, प्रशांत कुलकर्णी तसेच इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते

Read More

जळगाव : प्रतिनिधी यंदाही युवाशक्ती फाऊंडेशन तर्फे शुक्रवार दि. 19 ऑगस्ट 2022 रोजी काव्यरत्नावली चौक, जळगाव येथे सायं 6 वाजेपासून तरूणींची दहीहंडी आयोजित करण्यात आली आहे. सदर आयोजनाचे हे 14 वे वर्ष असून यावर्षी मोठ्या प्रमाणात आयोजनाची तयारी सुरू आहे. डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाचे मुलींचे गोविंदा पथक, शिवतांडव प्रतिष्ठान चे 130 वादकांचे ढोल पथक, हायटेक लाईटस, बालगोपालांसाठी श्रीकृष्ण वेषभूषा स्पर्धा, मल्लखांब चे थरारक प्रात्यक्षीक, सांस्कृतिक नृत्य आदी. या दहीहंडी महोत्सवाचे मुख्य आकर्षण आहे. जळगाव जिल्ह्यात सार्वजनिक रित्या युवाशक्ती फाऊंडेशन तर्फे एकमेव तरूणींच्या गोविंदा पथकाची दहीहंडी आयोजित करण्यात येते. दहीहंडी सारख्या उत्सवात महिलांना मुख्य प्रवाहात आणून उत्सवाचा आनंद…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील महाबळ परिसरानजीक असलेल्या संभाजी नगरातील रहिवासी ५४ वर्षीय महिलेचा बंद घरात मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेली माहिती अशी की, संभाजी नगरातील रहिवासी लिलाबाई यादव इंगळे (वय-५४) या भुसावळ येथे नोकरीला होत्या. अविवाहित असल्याने त्या संभाजी नगरात घरी एकट्याच राहत होत्या. मंगळवारी १६ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास घरात लिलाबाई इंगळे याचा मृतदेह मयतस्थितीत आढळून आला. शेजारी राहणाऱ्या नागरीकांना दुर्गंधी आल्याचे हा प्रकार उघडकीला आला. याबाबत रामानंदनगर पोलीसांना कळविल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आला आहे. दरम्यान, दोन ते…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख आणि मराठा समाजाचे नेते दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांना राज्यापाल कोट्यातून विधानपरिषदेवर घ्यावं, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी केली आहे. विनायक मेटे यांच्या कारला पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर नुकताच भीषण अपघात झाला. यामध्ये मेटे यांचं निधन झालं. तीन दिवसांपूर्वी रविवारी पहाटे साडे पाचच्या सुमारास ही दुर्घटना घडली होती. पतीच्या अपघाती निधनावर त्यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी संशय व्यक्त केला असून मेटेंच्या अपघाती मृत्यूची चौकशी व्हावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. विनायक मेटे यांनी मराठा आरक्षासाठी मोठा लढा उभा केला होता. मेटे यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीला विधानपरिषदेवर संधी मिळावी, असं अंकुश…

Read More

भडगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावात ३० वर्षीय विवाहितेच्या घरात घुसून विनयभंग करत परिवारातील सदस्यांना मारहाण केल्याची घटना दि. १५ रोजी सायंकाळी घडली आहे. या प्रकरणी पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून भडगाव पोलीस स्थानकात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील एका गावात ३० वर्षीय विवाहित आपल्या राहत्या घरात दि. १५ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास नेहमी प्रमाणे काम करत होती. यावेळी रवींद्र रणजित चव्हाण याने दारूच्या नशेत पिडीत विवाहितेच्या घरात अनाधिकृत प्रवेश केला. एवढेच नव्हे तर पिडीतेने तु घरात कशासाठी आला?, असे विचारताच रवींद्र चव्हाण याने पीडीतेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच चापटाबुक्यांनी मारहाण…

Read More

मुबई : वृत्तसंस्था एमपीएससी आणि बीएड सीईटी परीक्षा एकाच दिवशी आली आहे. दरम्यान, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी परीक्षार्थींना सरकारने पर्याय दिला आहे. दोन्ही परीक्षा देणाऱ्यांना तारखेबाबत पर्याय देण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. 21 ऑगस्ट रोजी एकाच तारखेला एमपीएससी आणि बीएड सीईटी परीक्षा आल्याने विद्यार्थ्यांच्या समोर मोठी अडचण निर्माण झाली होती. मात्र आता यावर सरकारने तोडगा काढला आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा आणि बीएड सीईटी परीक्षा 21 ऑगस्ट या एकाच दिवशी आल्याने विद्यार्थ्यांचा मोठा गोंधळ उडाला होता. एमपीएससी अर्थात महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा 21 ऑगस्टला आहे. तर बीएड सीईटी परीक्षा 21 ऑगस्टपासून तीन दिवस आहे.…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील वराड गावात जुन्या भांडणातून दोट गटात तुफान हाणामारी झाली. या दोन्ही गटांकडून एकमेकांवर कुऱ्हाडीने वार करण्यात आले. याप्रकरणी दोन्ही गटांतील तब्बल १९ जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वराड गावातील तुषार भगवान पाटील व सोमनाथ भरत पाटील यांच्या गटात अनेक दिवसांपासून वाद आहेत. याच वादाची ठीणगी १३ ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा पडली. किरकोळ कारणावरुन दोन्ही गट एकमेकांच्या समोर आले. यावेळी तुषार पाटील यांच्यावर टीकाराम पाटील, मुयर पाटील, राजु पाटील, सोमनाथ पाटील, सागर पाटील, प्रशांत पाटील, दीपक पाटील, दिनेश पाटील, सागर अशोक पाटील, नागराज पाटील, देविदास पाटील व मोरेश्वर पाटील यांनी हल्ला चढवला. प्रत्युत्तरात सोमनाथ पाटील…

Read More

धरणगाव  : प्रतिनिधी येथील मरिमाता मंदिर यात्रेमध्ये एका महिलेची सोन्याची पोत अज्ञात इसमाने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी धरणगाव पोलिसात महिलेने दिलेल्या तक्रारीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, शहरात दि १६ रोजी मरीमाता मंदिर येथे यात्रोस्तवाचा कार्यक्रम असल्याने रोजी दिवसभर शहरात यात्रेनिमित्त भाविक भक्तांनी गर्दी केलेली होती. त्याचवेळेस धरणगावातील मातोश्री नगरातील रहिवासी निवृत्त शिक्षिका रजनी हरिशचंद्र सूर्यवंशी(वय ६४) हे सुद्धा यात्रेत सहभागी झाले होते. यावेळेस कुणी तरी अज्ञात इसमाने त्यांच्या गळ्यातील ८७ हजार ५०० रुपये किमतीची २५ ग्राम सोन्याची मोहळ माळ लांबवली. याप्रकरणी धरणगाव पोलिसात रजनी सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरटयविरोधात गुन्हा दाखल करण्यात…

Read More