Author: editor desk

चाळीसगाव : प्रतिनिधी शहरात बँकेच्या कामानिमित्त आलेल्या पिलखोड येथील ८० वर्षीय वृद्धेचा बसच्या चाकाखाली आल्याने जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी बसस्थानकात घडली हाेती. याप्रकरणी गुरुवारी बस चालकाच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. तालुक्यातील पिलखोड येथील पार्वताबाई लक्ष्मण पाटील (वय ८०) ह्या बुधवारी दुपारी बँकेच्या कामानिमित्त चाळीसगाव येथे आल्या होत्या. काम आटोपल्यानंतर त्या घरी जाण्यासाठी सायंकाळी येथील बस स्थानकावर आल्या. त्यावेळी औरंगाबाद-धुळे या धुळे आगाराच्या बसने (एमएच १४ बीटी २३५२) त्यांना जोरदार धडक दिली तसेच त्यांच्या डाेक्यावरून बसचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला हाेता. सायंकाळी ६.१० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर…

Read More

मुक्ताईनगर : प्रतिनिधी राष्ट्रवादी जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने रोहिणी खडसे या मुक्ताईनगर वरून बोदवड तालुक्यात जात असताना त्यांना कालिंका माता मंदिर गेट माळेगाव फाटा येथे मध्यप्रदेशातील प्रवासी असलेल्या एका चारचाकी गाडीचा अपघात झाल्याचे निदर्शनास आले चारचाकी वाहनहे रस्त्याच्या कडेला असलेल्या सुमारे पंधरा फुट नालीत पलटी होऊन कोसळले होते पाच प्रवासी हे गंभीर जखमी होऊन वाहनात अडकून पडलेले होते ही बाब रोहिणी खडसे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी आपल्या सहकारी पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने त्या जखमी प्रवाशांना बाहेर काढून रुग्णवाहिका बोलावून मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले व पुढील जनसंवाद यात्रेसाठी रवाना झाल्या. राष्ट्रवादी जनसंवाद यात्रेच्या तिसऱ्या दिवशी रोहिणी ताई खडसे खेवलकर यांनी बोदवड तालुक्यातील…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी येथील एकशे आठ वर्षांची उज्ज्वल परंपरा असलेल्या शतकोत्तर पी.आर.हायस्कूलच्या शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, तहसील कार्यालय, पंचायत समिती आणि नगरपालिका प्रशासनातर्फे आयोजित विविध स्पर्धा तथा कार्यक्रमात उत्तम कामगिरी केल्याबद्दल स्मृती चिन्हे आणि प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि शाळेच्या विद्यार्थ्यांनी पी.आर.हायस्कूल सोसायटीच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आयोजित ७५ फुट लांबीच्या तिरंगा राष्ट्रध्वज रॅली आणि ‘नमन करो इस मिट्टी को’ या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतला म्हणून शाळेचा डाॅ. अरूण कुलकर्णी व डॉ.मिलिंद डहाळे यांच्या हस्ते स्मृती चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.शाळेचे मुख्याध्यापक डॉ.…

Read More

मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईजवळील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन हरिहरेश्वरच्या समुद्रात दोन संशयास्पद बोटी सापडल्याने खळबळ उडाली होती. या बोटींमध्ये एके-४७ सह काही शस्रास्त्रे सापडल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बोटीबाबत सभागृहात महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. रायगडच्या समुद्र किनाऱ्यावर आलेली ही बोट ऑस्ट्रेलियन महिलेच्या मालकीची असल्याचे फडणवीस यांनी सभागृहात सांगितले. मुंबईवर झालेल्या २६/११ च्या हल्ल्यावेळी दहशतवादी सागरी मार्गानेच मुंबईत दाखल झाले होते. त्यामुळे राज्याला जास्त धोका हा समुद्रमार्गी असल्याने कडेकोट सुरक्षा ठेवण्यात येत आहे. तसेच राज्यात आज सकाळी रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वरच्या समुद्रात शस्त्रास्त्रांनी भरलेली बोट सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. काही तासांपूर्वीच ही बोट…

Read More

जळगाव : प्रतीनिधी एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दोन हॉटेलवर गुरुवारी सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा यांच्या पथकाने छापा टाकला. येथील हॉटेलमधून पोलिसांनी डझनभर जोडप्यांना पकडले असून चौकशी कामी त्यांना एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या जवळच असलेल्या एका हॉटेलमध्ये सुरू असलेला कुंटनखाना, अयोध्या नगर परिसरात सुरू असलेला कुंटनखाना पोलिसांनी उध्वस्त केल्यानंतर आज पुन्हा दोन हॉटेलवर पथकाने छापा टाकला आहे. औरंगाबाद महामार्गावर आर.एल.चौफुली ते जळगाव काटा दरम्यान असलेल्या एका हॉटेलवर आणि भुसावळ महामार्गावर गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयजवळ एका हॉटेलवर पथकाने छापा टाकला. दोन्ही ठिकाणाहून पथकाने १८ पेक्षा जास्त तरुण-तरुणींना ताब्यात घेतले आहे. सर्वांना एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून त्यांची…

Read More

चोपडा : प्रतिनिधी चोपडा शहर पोलीसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दि. १७ रोजी रात्री चोपडा – शिरपूर रस्त्यावरील एस्सार कंपनीच्या पेट्रोल पंपाजवळ अवैद्य शस्त्र खरेदी विक्री करतांना चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याजवळून ६ गावठी बनावटीचे कट्टे, ३० जिवंत काडतूस, ४ मोबाईल फोन व फोर्ड कंपनीचे चार चाकी वाहन जप्त करण्यात आले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, दि. १७ रोजी रात्री ९.३० वा. सुमारास चोपडा ते शिरपुर रोडवर एस्सार पेट्रोलपंपाजवळ 1) गणेश उर्फ सनी सुनिल शिंदे (वय 25 रा. ओगलेवाडी ता. कराड जि.सातारा ), मोहसीन हनिफ मुजावर (वय 30 रा.युवराज पाटील चौक, मसुर ता.कराड जि. सातारा ) रिजवान…

Read More

हरिहरेश्वर : वृत्तसंस्था देशात १५ ऑगस्टच्या दिवशी दिल्ली उडवायची धमकी दिल्याचे वृत्त समोर आले होते. त्यानंतर आज रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर आणि भरडखोल या पर्यटनस्थळी समुद्रात दोन संशयास्पद बोटी आढळून आल्या आहेत. या बोटींमध्ये एके ४७ रायफल सापडल्यानं खळबळ उडाली आहे. प्रशासन घटनास्थळी दाखल झाल्यानंतर स्थानिकांच्या मदतीनं ही बोट किनाऱ्यावर आणण्यात आली. पण ही बोट नेमकी कोणाची आहे, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. यांपैकी एका बोटीमध्ये तीन एके-४७ रायफल्स सापडल्या आहेत. पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. पण हे लोक नेमके कोण आहेत हे समजू शकलेलं नाही. खासदार सुनील तटकरे म्हणाले, हरिहरेश्वरच्या परिसरात घातक शस्त्रे असल्याची बोट सापडली आहे. काही…

Read More

जळगाव : प्रतिनिधी येथील अवघ्या १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा विवाह बीडच्या डोंबरी गावच्या तरुणाशी बळजबरीने लावून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. मात्र, या मुलीने अतिशय धाडसाने या लग्नाला विरोध करण्याचा निर्णय घेतला. तिला सासरी घेऊन जाण्यासाठी आलेल्या सासऱ्याची नजर चुकवून तिने बसस्थानकातून पळ काढला आणि थेट अंबड पोलीस ठाणं गाठलं. यानंतर तिने आपली आपबिती पोलिसांना सांगितली. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून, जळगाव येथील १५ वर्षीय मुलीच्या वडिलांचे दोन महिन्यांपूर्वी निधन झाले. वडिलांनी मृत्यूपूर्वी तिचा विवाह बीडच्या पाटोदा तालुक्यातील डोंबरी गावच्या एका तरुणाशी ठरवला होता. वडील गेल्यानंतर मुलगी अल्पवयीन असतानाही तिच्या आई आणि मामा यांनी त्या तरुणाशी विवाह लावून दिला. लग्नानंतर तिने…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात शिंदे सरकार आल्यानंतर पहिल्याच पावसाळी अधिवेशनामध्ये आज शिवसेना आणि शिंदे गट आमनेसामने आला. शिंदे गटाचे नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि अंबादास दानवे यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली. त्यामुळे सभापती नीलम गोऱ्हे यांनी ‘तुम्ही मंत्री असाल तर घरी’ असं म्हणत त्यांना चांगलेच सुनावले. शिक्षकांच्या बाबतीतील एका प्रश्नावरुन गदारोळ सुरू असताना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गदारोळादरम्यान मंत्री गुलाबराव यांना वारंवार खाली बसण्याची विनंती करत होत्या. “गुलाबराव पाटील मी तुम्हाला वारंवार विनंती केली, ताकीद दिली, आधी खाली बसा ताबडतोब. सभागृहात वागायची ही कुठली पद्धत आहे. संसदीय कार्यमंत्री आपण यांना समज देऊ शकत नाही का? परत परत सभापतींना…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था पहिल्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी उडाल्यानंतर आज दुसऱ्या दिवशीही सभागृहात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राज्य सरकारमधील मंत्री आमने-सामने आले. यावेळी अजित पवार यांनी पटलावर नसलेला प्रश्न विचारल्याने सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांची चांगलीच तारांबळ उडाली. तसंच दुसऱ्या एका प्रश्नावर बोलताना तानाजी सावंत यांनी वापरलेल्या ‘फेमस’ या शब्दामुळेही सभागृहात चांगलाच गदारोळ उडाला. पालघर जिल्ह्यातील हत्तीरोगाचा वाढता प्रादुर्भाव यावर सरकारकडून काय उपाययोजना केल्या जात आहेत, असा प्रश्न पालघर जिल्ह्यातील आमदारांनी उपस्थित केला होता. यावर तानाजी सावंत यांनी सरकारने केलेल्या उपाययोजनांची माहिती सभागृहाला दिली. मात्र यानंतर अजित पवारांनी पालघर जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या…

Read More