Author: editor desk

धरणगाव : प्रतिनिधी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा आज धरणगावात ज्या मार्गाने आगमन होणार आहे. त्याच मार्गावरील बॅनर फाडल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. यामुळे काही काळ मोठा तणाव निर्माण झाला होता. “शिव संवाद” यात्रा दौरा आज दि.२० ऑगस्ट, शनिवारी दुपारी १ वाजता धरणगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकजवळ आयोजित केला आहे. यानिमित्ताने धरणगाव शहरात शिवसेना व युवा सेना कडून आदित्य ठाकरे यांचे स्वागत बॅनर जागोजागी लावले आहेत. शुक्रवारी मध्यरात्री काही अज्ञातांकडून शहरातील गणेश नगर, हेडगेवार नगर, व उड्डाण पुलाजवळ शिव संवाद यात्रेचे स्वागत बॅनरवर नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे बॅनर फाडल्याचा प्रकार पाहायला मिळाला. जवळपास सहा ते सात ठिकाणी हे…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था मुंबईत 26/11 रोजी झालेला दहशतवादी हल्ला महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. या दहशतवादी हल्ल्यात अनेक निष्पाप लोकांनी आपले जीव गमावले होते. त्या हल्ल्यात देशाच्या जवानासोबत पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली होती. अशातच आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. 26/11 सारखाच हल्ला पुन्हा करण्याची धमकी पाकिस्तानमधून देण्यात आली आहे. 26/11 सराखा दहशतवादी हल्ला करण्याची धमकी मुंबई ट्राफिक पोलिसांना देण्यात आली आहे. ट्राफिक पोलिसांच्या कंट्रोल रुममधील व्हॉट्सअॅप नंबरवर धमकीचा मेसेज आला आहे. या मेसेजमध्ये ६ दहशतवादी भारतात पोहोचल्याचा दावा केला गेला आहे. तसंच लवकरच मुंबईत २६/११ सारखा हल्ला करण्याची धमकी यात दिली गेली आहे. या मेसेजनंतर…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील एमआयडीसी परिसरात असलेल्या दोन लॉजवर पोलिसांनी गुरुवारी धाड टाकली होती. यावेळी लॉजवर तब्बल 13 जोडपी पोलिसांना आक्षेपार्ह अवस्थेत मिळून आली होती. यावेळी पोलिसांनी लॉज मालक दलालांनाही ताब्यात घेतले होते. याप्रकरणी रात्री उशिरा चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन लॉजजवर अनैतिक प्रकार सुरु असल्याची माहिती सहायक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा यांना मिळाली होती. त्यानुसार जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक गणेश देशमुख यांच्यासह पथकाने धाड टाकली. सागर हॉटेल व लॉज येथे 3 मुली व 3 मुले तर हेरंब पॅलसे या ठिकाणी 9 मुली व 9 मुलं मिळून आली. यात काही मुली वेगवेगळ्या महाविद्यालयात…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील शासकीय तंत्रनिकेतन येथे दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना डिप्लोमाच्या प्रवेश प्रक्रियेची संपूर्ण माहिती देण्यासाठी शासकीय तंत्रनिकेतन जळगाव या संस्थेमार्फत शनिवारी दि. २० ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11 वाजता संस्थेतील मुख्य इमारतीत (ड्राॅईंग हॉल ४) मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना व पालकांना डिप्लोमा प्रवेशासाठी कट ऑफ म्हणजे काय, ऑप्शन फॉर्म कसा भरावा, सर्व संस्थांची फी कोणत्या वेबसाईट वरून बघण्यात यावी. अश्या अनेक मुद्यावर या मार्गदर्शन आयोजित केले आहे. तसेच विद्यार्थी व पालकांच्या मनात असलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व विद्यार्थी व पालक यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन…

Read More

मुक्ताईनगर : प्रतिनिधी लंघूशंकेसाठी रस्त्यावर थांबलेल्या दाम्पत्याला सात ते आठ जणांनी जंगलात नेत मारहाण करून लुटल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. चोरट्यांनी विवाहितेच्या अंगावरील दागिने आणि रोकड असा एकूण ३७ हजार २०० रूपयांचा ऐवज जबरी लुटून नेला आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीसांनी तात्काळ तपासचक्र फिरवीत सहा जणांना अटक केलीय. पंकज रामसिंग राठोड (वय-२१, रा. जोंधनखेडा ता. मुक्ताईनगर) हा तरूण आपल्या पत्नीसह मुक्ताईनगर तालुक्यातील माळेगाव शिवारातील कालिंका माता मंदीराच्या पुढे जवळ बुधवारी १७ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास लघुशंकेसाठी थांबला. याचवेळी बहादू, तोरे, आणि प्रताप याच्यासह इतर ७/८ अनोळखी जणांनी दोन्ही पती-पत्नीला जंगलात नेवून बेदम मारहाण केली. यानंतर राठोड यांच्या पत्नीच्या…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  आज दहीहंडी असून कार्यक्रमा दरम्यान कोणत्याही गोविंदास दुखापत झाल्यास शासकीय रुग्णालयांमध्ये त्यांना मोफत उपचार देण्यात यावेत अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधानसभेत केली होती. त्यानुसार राज्यातील सर्व शासकीय दवाखाने, वैद्यकीय महाविद्यालये, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हापरिषदेचे दवाखाने यांना नि:शुल्क वैद्यकिय उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासंदर्भात काढण्यात आलेला शासन निर्णय हा स्थायी असून यावर्षी पासून दर वर्षासाठी लागू राहील

Read More

धरणगाव : प्रतिनिधी वडिलांकडून प्लॉट व रिक्षा घेण्यासाठी अडीच लाख रुपयाची मागणी करून विवाहितेचा मानसिक छळ केल्याप्रकरणी सासरच्या १० जणांविरुद्ध पाळधी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात नूरजहा जाबीर देशपांडे (वय २६, रा. एस.पी. बेकरी जवळ धरणगाव) या विवाहितेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, २ मी २०२१ रोजी खोटे आरोप लावून रात्रभर मारहान केली. तसेच मुलीसोबत घरा बाहेर काढले. त्यावेळेस धमकावून सांगितले की, तू तुझ्या वडिलांकडुन प्लॉट व रिक्षा घेण्यासाठी अडीच लाख घेवून ये, असे सांगून मला ‘हम भिकारी की पोर कर के फस गये है’. आम्ही दुस-या ठिकाणी लग्न केले असते तर आम्हाला चांगला हुंडा मिळाला असता,…

Read More

जळगाव : प्रतिनिधी सरकारी नोकरीचे आमिष देऊन फसविल्याची घटना जिल्हापेठ पोलीस ठाण्याअंतर्गत घडली आहे. आरोग्य विभाग, रेल्वेत नोकरी लावून देण्याची थाप एका ठगबाजानं मारली. त्यासाठी वेळोवेळी ४ लाख ४० हजार लाख रुपये उकळले. भूषण शरद पाटील (रा.खाजोळा ता.पाचोरा) असं त्या ठगबाजाचं नाव आहे. या संदर्भात अधिक असे की, प्रदीप चीतामन ससाणे (वय ५५) यांना भूषण पाटील याने त्यांचा मुलगा आणि भाच्याला आरोग्य विभागात आरोग्य सेवक, रेल्वे , म्हाडा, वाहन चालक, रेल्वे ग्रुप डी, अशा विभागमध्ये सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले होते. भूषण पाटील याने प्रदीप ससाणे यांच्याकडून डिसेंबर २०१९ ते जुलै २०२२ पर्यंत रोख रक्कम १,३,०००/- तसेच त्यांचे महाराष्ट्र…

Read More

नांदेड : वृत्तसंस्था जिल्ह्यातील बारड इथे ५० हजाराची सुपारी देत आईनेच केला पोटच्या मुलाचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 14 ऑगस्ट रोजी बारड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुशील नामक युवकाचा खून झाला होता. या प्रकरणी बारड पोलिसांनी छडा लावत या खूनामागे मयताची आईच असल्याचे समोर आलं आहे. सुशिल श्रीमंगले असं खुन झालेल्याचे नाव आहे. शोभा श्रीमंगले, राजेश पाटील, विशाल भगत असे अटक केलेल्या संशयित आरोपींचे नाव आहे. नांदेडच्या गिता नगर भागात राहणाऱ्या सुशिल श्रीमंगले याचा मृतदेह मुदखेड तालुक्यातील बारड शिवारात सापडला होता. पोलिस तपासात सुशिलचा गळा आवळून खून झाल्याची बाब पुढे आली होती. सुशिल हा आई आणि वडील यांना…

Read More

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या घरी सीबीआयने छापा टाकल्याची बातमी समोर आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या घरी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली आहे. याची माहिती खुद्द सिसोदिया यांनीच ट्वीट करत दिली आहे. यामध्ये त्यांनी सीबीआय आली असून, त्यांचे स्वागत आहे. आम्ही अत्यंत प्रामाणिक असून, लाखो मुलांचे भविष्य घडवत आहे. मात्र,आपल्या देशात चांगले काम करणाऱ्यांना अशा प्रकारे त्रास दिला जातो, हे अत्यंत दुर्दैवी आहे. त्यामुळेच आपला देश अजून नंबर-१ बनलेला नसल्याची टीका केली आहे. सत्यंद्र सिंह यांच्यापाठोपाठ दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री मनिष सिसोदिया यांच्या घरात आज सीबीआय पोहोचली आहे. हे प्रकरण दिल्लीतील एक्साईज पॉलिसी…

Read More