जळगाव : प्रतिनिधी राम टोटल बॉडी चेकअप सेंटरचे संचालक डॉ.प्रभू व्यास लिखित “सेक्स मॅटर्स” या कामजीवनावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन दिल्लीत “सेक्सोलॉजी” विषयावरील राष्ट्रीय परिषदेत एका हॉटेलमध्ये झाले. या पुस्तकामुळे कामजीवनातील अनेक समज, गैरसमज दूर होण्यास मदत होईल. हे पुस्तक डॉक्टर, विद्यार्थांना अभ्यासाच्या दृष्टीने मार्गदर्शक व सर्वसामान्यांसाठी देखील मोलाचे ठरेल,असा सूर मान्यवरांच्या मनोगतातून उमटला. या पुस्तकाचे प्रकाशन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सेक्सोलॉजिस्ट चेन्नईचे डॉ.नारायण रेड्डी, मुंबईतील नानावटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ.राज ब्रम्ह्नभट , हैद्राबादचे डॉ.व्यंकट रामण्णा, नागपूर येथील डॉ.संजय देशपांडे, कोल्हापूर येथील डॉ.राजसिंह सावंत आदींच्या मुख्य उपस्थितीत झाले. या परिषदेत स्त्री – पुरुषांमध्ये असमधनाता, नसांची कमजोरी, शीघ्रपतन, समलिंगी आकर्षण, लिंगरोपण, हर्निया, हायड्रोसील, इंद्रियाची…
Author: editor desk
वाशीम : वृत्तसंस्था वाशीममध्ये माणगाव-पुणे मार्गावरील ताम्हिणी घाटात कारचा अपघात होऊन अपघातग्रस्त कार २०० फूट खोल दरीत कोसळली. यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर तीनजण गंभीर जखमी झाल्याची घटना २० रोजी शनिवारी सायंकाळी घडली. मृत तिन्ही प्रवासी वाशीम जिल्ह्यातील आहेत. जखमींवर माणगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे. सविस्तर वृत्त असे की, वाशीम जिल्ह्यातील काही युवक कोकण पर्यटनासाठी गेले होते. परतीच्या वाटेवर असताना माणगाव पुणे मार्गावरील ताम्हिणी घाटात कारचा अपघात झाला. २०० फूट खोल दरीत कार कोसळली. यामध्ये गाडीचा चुराडा झाला. या अपघातात ऋषभ चव्हाण, सौरभ हिंगे, कृष्णा राठोड यांचा जागीच मृत्यू झाला हे सर्व मृतक वाशीम जिल्ह्यातील…
सांगली : वृत्तसंस्था घरी आलेल्या पाहुण्यांचा योग्य सन्मान राखता. मग, गणपतीचा किती राखायला हवा? चित्रपटाची गाणी लावणे, त्यावर बीभत्स नृत्य करणं हे प्रकार बंद व्हायला हवेत, असं मत कालीपुत्र कालीचरण महाराज यांनी व्यक्त केलंय. सांगलीत शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीनं प्रथमच कावड यात्रा काढण्यात आली. कालीचरण महाराजांच्या उपस्थितीत ही यात्रा पार पडली. कालीचरण महाराज म्हणाले, गणेशोत्सव जवळ आला असून आपण गणपतीचे कशापद्धतीनं पूजन करतो, त्याला कसा निरोप देतो याचा विचार करायला हवा. घरी आलेल्या पाहुण्याला आपण सन्मानानं निरोप देतो. पण, गणपतीला अनेकदा तेवढा सन्मान का मिळत नाही? त्याच्यासमोर चित्रपटाची गाणी लावली जातात. विसर्जन मिरवणुकीत तशीच गाणी व नृत्य सादर केलं जातात.…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था राष्ट्रीय जनता दलाच्या सहकार्यानं स्थापन झालेलं नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील महागठबंधन सरकार सतत वादात सापडत आहे. विरोधी पक्षांच्या राजकीय भाषणबाजीनंतर, हे प्रकरण आता न्यायालयात पोहोचलंय. सरकार स्थापन होऊन आठवडाही उलटला नाही, तोच सरकार बरखास्त करण्याची मागणी जोर धरू लागलीय. यासाठी पाटणा उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलीय. असंवैधानिक मार्गानं स्थापन झालेलं हे सरकार बरखास्त करण्यात यावं, अशी मागणी फिर्यादीनं न्यायालयाकडं केलीय. याचिकाकर्त्यानं 2017 मध्ये आरजेडी सोडल्यानंतर आणि भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानंतर आरजेडी आणि तेजस्वी यादव सरकारला जनादेश चोरण्यास सांगत होते, याची आठवण करून दिलीय. याच आधारावर नितीशकुमार यांचं सध्याचं सरकार घटनाबाह्य आहे. त्यामुळं कलम १६३ आणि…
नाशिक : वृत्तसंस्था गेल्या अडीच वर्षांपासून कोरोना संसर्ग आजाराचा सामना करणाऱ्या नागरिकांना आता कुठे दिलासा मिळत असताना स्वाइन फ्लूच्या आजाराने डोके वर काढले आहे. स्वाइन फ्लूच्या रुग्णांचा आकडा शहरामध्ये ९४ च्या वर पोचला असून, ११ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, असे असले तरी स्वाइन फ्लूमुळे शहरातील मृतांची संख्या अवघी तीन असून, उर्वरित मृत ग्रामीण भागातील आहे. जून महिन्यापासून स्वाइन फ्लूचे रुग्ण सातत्याने आढळत आहे. जून महिन्यात दोन जुलै महिन्यात २८ तर ऑगस्ट महिन्यात ६४ रुग्ण आढळून आले आहे. स्वाइन फ्लूमुळे उपनगर येथील एका महिलेचा मृत्यू झाला. राजूनगर येथील एका ६५ वर्षी व्यक्ती व राणेनगर मधील आणखी एका महिलेचा असे तीन…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील फुले मार्केट परिसरातून एका अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी १९ ऑगस्ट रोजी दुपारी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तिरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील कुसुंबा येथे १२ वीत शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. १८ ऑगस्ट गुरूवार रोजी नातेवाईकांसह अल्पवयीन मुलगी जळगाव शहरातील फुले मार्केट परिसरात कामानिमित आले होते. दरम्यान अज्ञात व्यक्तीने तिला पळवून नेल्याचे प्रकार उघडकीला आला. तिच्या नातेवाईकांनी संपूर्ण फुले मार्केट परिसर पिंजून काढला. शुक्रवार १९ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या…
धरणगाव : प्रतिनिधी येथील धरणी चौकातील एका सोनाराला बनावट सोनं गहाण ठेवण्याच्या नावाखाली चक्क सहा लाखात गंडवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या संदर्भात अधिक असे की, शहरातील धरणी भागात कौस्तुभ सराफ (रा. पंचमुखी हनुमान मंदिर जळगाव) यांचे रुद्र ज्वेलर्स नावाने दुकान आहे. श्री.सराफ यांच्याकडे धर्मेंद्र यादव आणि एक अनोळखी व्यक्ती मागील काही दिवसांपूर्वी एक दोन वेळेस सोने तारण ठेवून पैसे घेऊन गेले होते. व्यवहार बरा असल्यामुळे श्री.सराफ यांनी धर्मेंद्र यादवकडून १९ ऑगस्ट रोजी १८ तोळे सोने तपासून ६ लाख ९ हजार ५०० रुपयांमध्ये तारण ठेवले. परंतु श्री. सराफ यांनी जळगाव येथे गेल्यावर सोन्याचे दागिने तपासून बघितले असता, त्यावर फक्त…
परभणी : वृत्तसंस्था परिवारातील अथवा ओळखीच्या व्यक्तीकडून मुलींसोबत वाईट कृत्य केल्याच्या घटना आपण नेहमीच ऐकत असतो. मात्र, परभणीच्या पाथरी तालुक्यातील हादगाव इथे बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. तेरा वर्षाची अल्पवयीन मुलगी घरामध्ये झोपले असताना वडिलांनी वाईट उद्देशाने मुलीचा विनयभंग केला आहे. याप्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यामध्ये आईने दिलेल्या तक्रारीवरुन वडिला विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हदगाव इथे एक तेरा वर्षाची अल्पवयीन मुलगी घरात पलंगावर झोपली होती. यावेळी त्या ठिकाणी मुलीचे वडील आले. मुलींनी एकटी पाहून त्यांनी वाईट उद्देशाने मुलीचा विनयभंग केला. याला मुलीने विरोध केल्यानंतर वडिलांनी घडलेला प्रकार कोणाला सांगितला तर जीवे मारण्याची धमकी दिली. मुलीने झालेला…
राजस्थान : वृत्तसंस्था राजस्थानच्या पाली जिल्ह्यात भीषण अपघात झाला असून त्यात ७ भाविकांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात २५ हून अधिक जण जखमी झाले आहेत. अपघातातील मृतांचा आकडाही वाढण्याची शक्यता आहे. सुमेरपूर पोलीस स्टेशन परिसरात रात्री ९ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. यात्रेकरू ट्रॅक्टर ट्रॉलीतून जैसलमेर जिल्ह्यातील रामदेवरा मंदिरात दर्शनासाठी जात होते. मात्र सुमेरपूरजवळ भाविकांवर काळाने झडप घातली. भरधाव वेगात आलेल्या ट्रॉलीने ट्रॅक्टरला धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की यात सात जणांचा जागीच मृत्यू झाला. खमींना शिवपूर आणि सुमेरपूर शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातात बळी पडलेले सर्व भाविक गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील रहिवासी…
धरणगाव : प्रतिनिधी शहरातील आज ‘शिव संवाद’ यात्रेच्या निमित्त शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरेंचे गावात लावलेले बॅनर फाडणाऱ्याविरुद्ध शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी धरणगाव पोलिसात तक्रार दिली आहे. गुलाबराव वाघ यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आज दि. २० ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी १ वाजता युवा सेना प्रमुख माजी पर्यावरण मंत्री अदित्य ठाकरे यांचा शिवसंवाद यात्रा कार्यक्रम असल्याने सदर कार्यक्रमानिम्मीत्ताने शहरात ठिक ठिकाणी बॅनर लावण्यात आलेले आहे. सदर बँनवर माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे तसेच कार्यकर्त्यांचे फोटो लावण्यात आले होते. धरणगाव-एरंडोल रोडावरील गणेश नगर स्टॉप येथे लावण्यात आलेले आमदार आदित्य ठाकरे यांचे शिवसंवाद…

