Author: editor desk

वरणगाव : प्रतिनिधी  भुसावळ तालुक्यातील हतनूर गावाच्या तापी नदीच्या पुलावरून पाण्यात उडी मारुण आयुध निर्माणी वसहात मध्ये राहणाऱ्या एका महिलेने आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी घडली. आयुध निर्माणी वसाहतीतील रहिवाशी अतूल सतिष वाणी ( ३२ ) रा क्वॉ न १७६ ए ( मोडीफाईड ) हे आपल्या परिवारा सोबत राहत असून बहीण प्रिया सतिष वाणी ( ३२ ) ही यांच्या सोबत राहत होती. दि २१ रविवार रोजी सकळी नऊ वाजेच्या सुमारास घरात कोणीही नसताना घरातून निघुन हतनूर गावा जवळील तापी नदीच्या पुलावर जाऊन पाण्यात उडी घेतली. येथे उपस्थीत असलेल्या नागरिकाच्या लक्षात आल्याने महिलेस वाचविण्यासाठी प्रयत्न करीत तीला पाण्या बाहेर काढले. मात्र…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था 92 नगरपरिषदांसाठी ओबीसी आरक्षण लागू होणार की नाही याचा फैसला लांबणीवर गेला आहे. आज सर्वोच्च न्यायालयात पार पडलेल्या सुनावणीत, पाच आठवडे स्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. तसेच, या संदर्भात सुनावणीसाठी विशेष खंडपीठ गठीत केलं जाणार आहे. महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडली. 92 नगरपरिषदांमध्ये आरक्षण लागू व्हावं, अशी सरकारने मागणी केली आहे. राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकनाची याचिका दाखल करण्यात आली आहे. या सुनावणी दरम्यान, सुनावणीसाठी विशेष खंडपीठ गठीत केलं जाणार आहे. तसेच, पाच आठवडे सुनावणी ‘जैसे थे’च ठेवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. त्यामुळे 92 नगरपरिषदांच्या निवडणुका…

Read More

यावल : प्रतिनिधी तालुक्यातील चितोडा येथील 38 वर्षीय युवकाची चाकूने गळा चिरून तसेच चाकूचे वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना रविवारी मध्यरात्रीच्या घडली. मनोज संतोष भंगाळे (रा.चितोडा, ता.यावल) असे मयत युवकाचे नाव आहे. चितोडा गावातील रहिवासी असलेल्या मनोज भंगाळे या युवकाचा मृतदेह चितोडा-डोंगरकठोरा रस्त्यावरील चंदूशेठ चौधरी यांच्या शेतात असल्याची माहिती सोमवारी सकाळी उघडकीस आली. मारेकर्‍यांनी अतिशय क्रूर पध्दतीत मनोज भंगाळे यांना संपविले आहे. त्यांच्या गळ्यात फास टाकून कोणत्या तरी वाहनाने ओढून रस्त्याला लागून असणार्‍या शेतात त्यांचा मृतदेह टाकण्यात आला आहे. यावल पोलिसांना याबाबतची माहिती कळवण्यात आल्यानंतर यावलचे पोलिस राकेश मानगावकर, उपनिरीक्षक विनोद खांडबहाले, गणेश ढाकणे, रोहिल गणेश, संदीप सूर्यवंशी,…

Read More

जळगाव : प्रतिनिधी खानदेशमधून मध्यप्रदेशमध्ये जाण्यासाठी महाराष्ट्र आरटीओ चेक पोस्टवर वाहनधारकांकडून हजारो रुपयाची वसुली केल्या जात असल्याची धक्कादायक आरोप राष्ट्रवादीचे नेते आ.एकनाथराव खडसेंना केला आहे. आ.खडसेंनी या ठिकाणी तात्काळ भेट देऊन अधिकाऱ्यांची कान उघडणी केली. तसेच या चेक नाक्यावरील प्रकाराबाबत विधान परिषदेत अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार असल्याचे सांगितले. महाराष्ट्र मध्य प्रदेश आरटीओ चेक पोस्ट नाक्याची वरिष्ठ स्तरावरून चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. चेक पोस्ट हा आरटीओ कर्मचाऱ्यांसाठी दोन नंबरच्या कमाईचे साधन आहे. वाहनचालकांकडून या ठिकाणी वसुली केली जाते. मध्यप्रदेश महाराष्ट्र आरटीओ चेकपोस्ट तर एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाणारी वाहनं असतात. अशावेळी त्यांच्याकड एकादा कागदपत्र कमी असला, तर त्यांच्याकडून वसुली केली…

Read More

जळगाव : प्रतिनिधी वीजग्राहकांना वैयक्तिक क्रमांकावरून बनावट मेसेज पाठवून वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधायला सांगणे, त्यानंतर एखादी लिंक पाठवून किंवा सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यास सांगणे व याप्रकारे वीजग्राहकाने प्रतिसाद दिल्यास आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार होत आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून प्राप्त झालेल्या बनावट मेसेजना प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून विविध ग्राहकांना बनावट मेसेज पाठवून लुबाडण्याचे प्रकार घडत आहे. नुकताच जळगाव जिल्ह्यात बनावट मेसेज पाठवून ऑनलाईन लुबाडल्याचा प्रकार घडला आहे. यासोबतच महावितरणकडूनदेखील बनावट मेसेज प्रकरणी सायबर सेलमध्ये याआधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. ‘मागील महिन्याचे वीजबिल अपडेट नसल्याच्या कारणावरून वीजपुरवठा खंडित करण्यात येणार…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था तुम्ही कमी उत्तपन होते त्यावेळेस तुम्ही रेशन कार्ड बनविले असेल व आता तुमचे उत्पन वाढले असेल तरीही तुम्ही रेशन कार्ड बंद केले नसेल तर आता येत्या 1 सप्टेंबरपासून शिधापत्रिकांची पडताळणी होणार आहे. कौटुंबिक परिस्थिती सुधारूनसुद्धा अनेकजण जुन्या रेशनकार्डचा वापर करत वर्षानुवर्षे स्वस्त किमतीमध्ये धान्य घेतात. धक्कादायक बाब म्हणजे अनेकजण स्वस्तातील रेशनधान्य घेऊन ते खासगी व्यक्तींना विकतात त्यामुळे जे गरजू आहेत त्यांना या धान्य मिळत नाही. अशा पद्धताने धान्य विकून ते सरकारची फसवणूक करत आहेत. माणसांना अन्न मिळत नाही काहीजण रेशनधान्य जनावरांना खाद्य म्हणू वापरल्याचंही उघड झालं आहे. तरूसुद्धा हे लोक रेशन धान्यावरील हक्क सोडण्यासाठी तयार नाहीत. फौजदारी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील इंद्रप्रस्थ नगर परिसरातून कारागिराची दुचाकी चोरी झाल्याची घटना १९ रोजी रात्री घडली आहे. याप्रकरणी शहर पोलिसात दुचाकी चोरून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, शहरातील इंद्रप्रस्थ नगरातील प्लॉट न ०३ येथून हिरो कंपनीची स्पेल्डर प्लस काळ्या रंगाची ३० हजार किंमतीची RJ.०५.LS ६९२२ या नंबरची केशवकुमार भरतसिंग (वय २४) यांची मालकीची दुचाकी लांबविल्याची घटना दि १९ रोजी रात्री ११ वाजता घडली आहे. याप्रकणी फिर्यादी केशवकुमार भरतसिंग यांनी दि २० रोजी सकाळी शहर पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास तपासी अमलदार प्रफुल्ल धांडे हे करीत…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  आम्ही शिवसेना वाचविण्यासाठी खूप प्रयत्न केलेत मात्र शिवसेना वाचवण्यासाठी केलेला हा प्रयत्न आदित्य ठाकरे यांना आवडलेला नाही. त्यामुळेच ते आमच्यावर टीका करत आहेत. मात्र आम्ही गद्दर नाही तर आम्ही खुद्दार आहोत, असं म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी गद्दार म्हणणाऱ्या आदित्य ठाकरे यांना टोला लगावला आहे. हे सरकार कोसळणारच असेही आदित्य ठाकरे म्हणाले होते. त्यावरही मंत्री गुलाबराव पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला. हे सरकार शिवसेना व भाजप युतीचं सरकार आहे. याकडे त्यांनी त्याच दृष्टीने बघावं, असंही मंत्री गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले. शिंदे गटात जाण्यापूर्वी मी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. मात्र त्यावेळी त्यांनी त्याची दखल घेतली असती…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जिल्हा दूध संघाला बदनाम करून संचालक मंडळाला अडचणीत आणण्यासाठी हेतपुरस्कर प्रयत्‍न केला जात आहे. जिल्‍हा बँकेत काही सापडले नाही; म्‍हणून दूध संघात हेतपुरस्कार अडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिंदे सरकारच्या माध्यमातून तसेच प्रशासन मंडळाच्या सहाय्याने जिल्हा दूध संघाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे. जिल्हा दूध संघाच्या कारभारात अध्यक्षा मंदाकिनी खडसे व त्यांचे संचालक मंडळाने गैरव्यवहार केल्याची तक्रार दूध संघाचे माजी कर्मचाऱ्याने शासनाकडे केली होती. त्या तक्रारीवरुन शिंदे सरकारकडून चौकशी समिती देखील नियुक्त केली. दरम्यान चौकशीत दहा कोटी रुपयांचा निधी शासनाची कुठलीही परवानगी न घेता संचालक मंडळांनी परस्पर खर्च केल्याचा धक्कादायक…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था दिल्लीच्या केजरीवाल सरकारच्या कथित मद्यधोरण घोटाळ्यासंबंधात सीबीआयने उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि अन्य १४ लोकांविरोधात लुकआउट नोटिस जारी केली आहे. सीबीआयने गुन्हा नोंदवलेल्याच १५ लोकांची नावे या लुकआउट नोटिशीमध्ये आहेत. मनीष सिसोदिया यांच्या घरी शुक्रवारी सीबीआयने छापे टाकले होते. त्यानंतर केजरीवाल सरकारने केंद्र सरकारविरोधात टीका केली होती. तसंच, मनीष सिसोदिया यांनीही येत्या दोन-चार दिवसांत मला अटक केली जाईल, असं म्हटलं होतं. मनीष सिसोदिया यांनी शक्यता वर्तवल्यानंतर २४ तासांतच सीबीआयने सिसोदिया यांच्यासह १४ लोकांविरोधात लुकआऊट नोटिस जारी केली आहे. सीबीआयची ही लुकआउट नोटिस सिसोदियांसह केजरीवाल यांच्यासाठी मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. कारण, आता सिसोदियांसह हे १४ जणांना…

Read More