भडगाव : प्रतिनिधी येथील शिवाजी नगरातील रहिवासी अनिल भास्कर पाटील (वय ३८, मूळ गाव, बाळद) २२ रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. दुर्दैवाची बाब म्हणजे २२ रोजीच त्यांच्या नवीन घराची वास्तुशांती होती. अनिल पाटील हे कृषी कंपनीचे मार्केटिंग व्यावसायिक होते. शेतकरी व ग्रामीण तसेच शहरी भागात त्यांचा मोठा जनसंपर्क होता. अत्यंत कष्टाने त्यांनी शिवाजीनगर भागामध्ये नवीन घर बांधले. त्या घराचा वास्तुशांती कार्यक्रम त्यांनी २२ रोजी आयोजित केला होता. यासाठी त्यांनी तयारी केली होती. शेकडो नागरिकांची भोजन व्यवस्था करून मंडप टाकण्यात आला होता. घरात नातेवाईकही आले होते. वास्तुशांतीची सर्व तयारी पूर्ण झाली होती. अचानक २२ रोजी पहाटे त्यांना हृदयविकाराचा झटका आला.…
Author: editor desk
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील धानोरे येथे विठ्ठल रुक्मिणी व संत शिरोमणी सावता महाराज यांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री गुलाबराव पाटील होते. प्रास्ताविक धानोऱ्याचे सरपंच भगवान मांडले. महाजन यांनी केले यावेळी व्यासपीठावर जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, जि.प.चे माजी सभापती पी. सी. पाटील, सुभाष पाटील, रमेश खंडू महाजन, नगराध्यक्ष नीलेश चौधरी, गटनेते कैलास माळी, डी.ओ. पाटील, सचिन पवार, राजेंद्र महाजन, दीपक सोनवणे, अनिल पाटील, ए. के. पाटील, नयन गुजराती, रमेश महाजन आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन परमेश्वर रोकडे यांनी केले आभार गोपाल बाविस्कर यांनी या मंदिरासाठी कै. चिंतामण व्यंकट पाटील…
जळगाव : प्रतिनिधी जिल्हात दोन महिन्यापासून खुनाचे सत्र सुरूच आहे , २१ रोजी सांयकाळी जळगावात खून तर २२ रोजी यावल तालुक्यात खून झाल्याने प्रंचड खळबळ उडाली होती. यातील आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची चांगलीच कसरत करावी लागत आहे तर दुसरीकडे गणेशोस्तव येत असल्याने पोलिसांच्या डोक्यावरचे भर आणखी वाढणार आहे. यात २२ रोजी झालेल्या गणेश मंडळाची बैठक पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. गणेश मंडळांनी लोकसहभागातून आपल्या निधीतील 10 टक्के निधी आपआपल्या भागात सीसीटीव्ही बसवण्यासाठी खर्च केल्यास 60 टक्के क्राइमला आळा बसेल, असे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी बोलतांना सांगितले. सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्ताने सोमवारी सकाळी…
जळगाव : प्रतिनिधी शिव कॉलनी येथील देशी दारुच्या अड्ड्यावर एका तरुणावर चापरने हल्ला करून ठार केले होते. या घटनेत कारण शुल्लक असल्याचे समजते. नादुरुस्त माेबाइलच्या पैशांच्या वादातून रविवारी दुपारी महामार्गालगत असलेल्या देशी दारुच्या अड्ड्यावर चाॅपरने सहा वार करून २३ वर्षीय तरुणाचा खून करण्यात अाला. या खुनातील मुख्य संशयिताला पाेलिसांनी शिरसोलीतून अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता २५ अाॅगस्टपर्यंत कोठडी देण्यात आली. जैन उद्याेग समुहात कंत्राटी कामगार असलेल्या अक्षय अजय चव्हाण (वय २३) याचा खून झाला होता. या घटनेतील प्रमुख संशयित आरोपी नीलेश प्रवीण पवार (रा. रिंगरोड, जळगाव) हा शिरसोली येथे आल्याबाबतची माहिती पोलिस हेडकॉन्स्टेबल जितेंद्र राठोड यांना मिळाली. पाेलिस…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील डी मार्ट ते इच्छादेवी चौक रस्त्याच्या कामाची सुरुवात करून जबाबदारी निश्चित करणेबाबत आज राष्ट्रवादीकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. राष्ट्रवादी महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आले. राष्ट्रवादीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील एक महिन्यापासुन डी मार्ट ते इच्छादेवी चौक या रस्त्याच्या दुर्दशेबाबत राष्ट्रवादीतर्फे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी पोलिस प्रशासनातर्फे आश्वासित करण्यात आले होते कि, संबंधितांशी सविस्तर बोलून रस्त्याचे काम करण्याबाबत निर्णय घेऊ. गेल्या १५ दिवसांपुर्वी महानगरपालिकेने रस्त्याचे कामाबाबत अंदाजपत्रक सादर करुन निविदा प्रक्रियाही राबविण्याचे निश्चीत झाले होते. परंतू सदरील रस्त्याबाबत निर्णय होत नाहीय. सदर रस्ता जळगाव शहर महानगर पालिकेने…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील रेशन दुकानातील ई पॉज मशीन सर्वर डाऊन मुळे बंद असून यामुळे रेशनवरील धान्याचा पुरवठा गेल्या पंधरा दिवसापासून बंद झाला आहेत. शिधापत्रिका धारकांचे अन्नधान्य हे सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानात उपलब्ध असतांना मात्र ई-पॉज मशीन अभावी लाभार्थ्यांनाही वंचित राहावे लागत असून त्यामुळे रेशन दुकानदारांना लाभार्थ्यांमध्ये खटके उडत आहेत. त्यामुळे इ पाँज मशिन तांत्रिक बिगाड़ तातडीने दुरुस्त करून धान्य पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाबाहेर शिधापत्रिका लाभार्थ्यासह जोरदार निदर्शने करण्यात आली त्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकारी श्री सुनिल सुर्यवंशी सो. यांना निवेदन देऊन खालील…
मुक्ताईनगर : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी ताई खडसे खेवलकर यांनी मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील १८२ गावात जाऊन जनतेसोबत संवाद साधण्यासाठी सुरू केलेली राष्ट्रवादी जनसंवाद यात्रेच्या पाचव्या दिवशी बोदवड तालुक्यातील शेवगे, चिखली बु, हरणखेड, चिचखेड प्र ग ,वडजी येथे पोहचली. प्रत्येक गावात ग्रामस्थांनी ढोल ताशांच्या गजरासह फटाक्यांच्या आतिषबाजीने जनसंवाद यात्रेचे स्वागत करण्यात आले. यावेळी रोहिणीताई खडसे यांनी ग्रामस्थां सोबत संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी, समस्या जाणून घेतल्या.काही समस्या तात्काळ सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यां सोबत दूरध्वनी वरून चर्चा केली प्रलंबित प्रश्न नाथाभाऊ, भैय्या साहेब ,व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सोडविण्याचे त्यांनी ग्रामस्थांना आश्वसित केले. यात्रेत जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे,व्हिजेएनटी सेल जिल्हाध्यक्ष अरविंद चितोडीया,बोदवड राष्ट्रवादी…
जळगाव : प्रतिनिधी औरंगाबाद हायकोर्टाकडून किनोदच्या लोकनियुक्त महिला सरपंच प्रियांका सूर्यवंशी ह्यांच्या विरोधातील अविश्वास प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. २०१७ साली तालुक्यातील किनोद गावाच्या लोकनियुक्त सरपंच म्हणून प्रियंका सूर्यवंशी ह्या निवडून आल्या होत्या. गावातील अंतर्गत कलह तसेच नाराज ग्रामपंचायत सदस्य यांनी दिनांक १५ फेब्रुवारी २०२१ रोजी सरपंचा विरुद्ध अविश्वास ठराव पारित केला होता. एकूण ८ सदस्यांपैकी ६ सदस्यांनी अविश्वास ठरावास संमती दर्शवली होती. सदर अविश्वास ठरावास मान्यता देण्यासाठी दिनांक २९ ऑक्टोंबर २०२१ रोजी विशेष ग्राम सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सर्व ग्रामस्थांनी मतदान करून आपला मतदानाचं हक्क बजावला होता. अविश्वास ठराव मान्यतेच्या दिवशी एकूण ६४५ मतदान झाले होते त्यात…
पुणे : वृत्तसंस्था शिंदे-फडणवीस सरकारला सुप्रीम कोर्टानं मोठा झटका दिला आहे. मुंबई महापालिकेतील वॉर्ड पुनर्रचना जैसे थे ठेवा, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. मविआ सरकारनं बीएमसीसाठी 236 वॉर्ड केले होते. शिंदे-फडणवीसांनी संख्या कमी करुन 227 वॉर्ड केले होते. शिंदे-फडणवीसांच्या निर्णयाला शिवसेनेनं आव्हान दिलं होतं. शिंदे सरकारने मविआ सरकारचा निर्णय रद्द करून पुन्हा २०१७ च्या म्हणजेच ४ च्या प्रभागानुसार निर्णय घेतला होता. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे. चारच्या प्रभागाबाबत राज्य सरकारला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यातील महापालिका निवडणुकांसाठी तीन सदस्यीय प्रभागरचना करण्यात आली होती. मात्र राज्यात सत्ताबदल झाल्यावर शिंदे-…
पुणे : वृत्तसंस्था व्यवसायात भरभराट व्हावी, घरात सुख शांती नांदण्यासोबत पुत्रप्राप्ती व्हावी, यासाठी पत्नीला सगळ्यांसमोर अंघोळ करण्यास पतीनेच भाग पाडल्याची संतापजनक घटना पुण्यातून समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही घटना घडली. एका बिझनेसमनने व्यवसायात भरभराट व्हावी, घरात सुख शांती नांदावी, यासाठी मांत्रिकाची मदत घेतली. इतकंच काय तर पुत्रप्राप्तीसाठीही त्याने मांत्रिकाची मदत घेत त्याला अघोरी पूजा करण्यास सांगितलं होतं. मांत्रिकांच ऐकून या बिझनेसमनने आपल्या पत्नीलाही पुजेत सामील करुन घेतलं.संतापजनक बाब म्हणजे यावेळी पूजेच्या नावाने या पतीने सर्वांच्या देखत आपल्या पत्नीला अंघोळ करण्यास भाग पाडलं. या संतापजनक प्रकाराची पोलिसात तक्रार देण्यात आली. त्यानंतर अखेर भारती पोलिसांनी आरोपी…

