जळगाव : प्रतिनिधी शहरातील निवृत्ती नगर परिसरात मध्यरात्री एक वाजेनंतर एका तरुणाचा चाकूने भोसकून खून झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. भावेश उत्तम पाटील (वय २८, रा. आव्हाने) असे मयताचे नाव आहे. विशेष म्हणजे जळगाव जिल्ह्यात चार दिवसातील हा तिसरा खून आहे. हा खून इतका भयंकर होता की तरुणाला तीक्ष्ण हत्याराने वार केल्याने तो जागीच ठार झाला होता. याबाबत जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की,शहरातील एसएमआयटी महाविद्यालायाजवळ मुख्य रस्त्यावर रात्री १२ ते १ वाजेच्या सुमारास भावेश पाटील याच्या भावाने जिल्हापेठ पोलिसात फिर्याद दिली आहे की, निवृत्ती नगरातील बंधन बँकेच्या समोर रात्री १२ ते…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था शिवसेना नेते संजय राऊत यांच्या अटकेनंतर आता त्यांचे बिझनेस पार्टनर सुजीत पाटकर यांच्याविरोधात मुंबईत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोविड सेंटरमध्ये 100 कोटींचा घोटाळा केल्याची तक्रार भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईतील आझाद मैदान पोलीस ठाण्यात केल्यानंतर आता गुन्हा दाखल करण्यात आलाय. सुजीत पाटकर आणि अन्य काही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सोमय्या यांनी दिली आहे. पाटकर यांच्या लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट कंपनीनं बोगस कागदपत्रं दाखवून खोट्या पद्धतीनं कोविड सेंटरचं कंत्राट मिळवल्याचा आरोप सोमय्या यांनी केलाय. पुरेशी क्षमता नसल्यानं अनेक कोविड रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. सुजित पाटकर हे संजय राऊत यांचे…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील निवृत्ती नगर परिसरात मध्यरात्री एक वाजेनंतर एका तरुणाचा चाकूने भोसकून खून झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. भावेश उत्तम पाटील (वय २८, रा. आव्हानी) असे मयताचे नाव आहे. विशेष म्हणजे जळगाव जिल्ह्यात चार दिवसातील हा तिसरा खून आहे. भावेश उत्तम पाटील (वय-२८, रा.आव्हाणे, हल्ली मुक्काम निवृत्तीनगर) असे मयताचे नाव आहे. रात्री १ वाजेच्या सुमारास एसएमआयटी महाविद्यालयासमोरील १०० फुटी रस्त्यावर हा खून करण्यात आला. चाकूने सपासप वार केल्याने तरुण रस्त्यावरच रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. खून करणारे संशयीत वाळूमाफिया असून वाळू व्यवसायाच्या वादातून खून झाल्याची कळते. मात्र, अद्याप खून कोणी केला व त्यामागील नेमकं कारण स्पष्ट…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात सत्ता बदल झाल्यापासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे गेल्या काही महिन्यांपासून शस्त्रक्रिया झाल्याने घरीच विश्रांती घेत होते. दोन-तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर अखेर राज ठाकरेंनी आज पहिली जाहीर सभा घेतली. या सभेत बोलताना त्यांनी माझी तुलना गद्दारांशी करू नका असं पुन्हा एकदा ठणकावून सांगितलं आहे. त्याचसोबत बाळासाहेब ठाकरेंची एक आठवणही सांगितली आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेच्या बड्या नेत्यांना घेऊन बंड करून शिवसेनेतून बाहेर पडले. त्यानंतर शिवसेनेतल्या ऐतिहासिक बंडांचा उल्लेख करताना राज ठाकरेंचं नावही वारंवार उल्लेखलं जात होतं. त्यावरुन राज ठाकरेंनी तेव्हाच ठणकावून सांगितलं होतं की माझी तुलना गद्दारांशी करू नका. त्याच संदर्भातली एक आठवण राज ठाकरेंनी शेअर केली आहे. आजवर…
जळगाव : प्रतिनिधी नगराध्यक्ष आणि सरपंचांची निवड थेट जनतेतून करण्याचा लोकशाहीला बळकटी देणारा निर्णय घेऊन शिंदे-फडणवीस सरकारने प्रस्थापितांच्या घराणेशाही प्रवृत्तीला चपराक लगावली आहे. सामान्य जनतेमधून नेतृत्व पुढे आल्यास ठरावीक घराण्यांची राजकारणातील मक्तेदारी संपुष्टात येईल या भीतीमुळेच विरोधकांनी या निर्णयास विरोध सुरू केला असला, तरी हा निर्णय घेऊन जनतेच्या भावनांचा सरकारने आदर केला आहे, अशा शब्दांत भाजपचे जिल्हाध्यक्ष आ सुरेश भोळे व महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. सरपंचांची निवड थेट जनतेमधून करण्यात यावी अशी मागणी राज्यातील नऊ हजार ग्रामपंचायतींनी ठराव करून सरकारकडे केली होती. महाराष्ट्र सरपंच परिषदेनेही या निर्णयाचे स्वागत केले आहे. जनतेचीही तीच मागणी असताना…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था व वाय आर जी केअरच्या मार्फत अमृत महोत्सव कोवॅक्सिन व कोविशिल्ड लसीकरण शिबिर स्व शांताबाई बाबुराव पाटील सभागृह व्यंकटेश कॉलनी जळगाव येथे २३ रोजी सकाळी 10:00 वाजता आयोजित करण्यात आले. सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत संपन्न झालेल्या या शिबिरास उदंड असा प्रतिसाद लाभला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त संपूर्ण देशभरात विविध कार्यक्रम साजरे होत आहे. त्या दृष्टीने नारी शक्तीने देखील स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हे शिबिर आयोजित केले. देशाचे स्वातंत्र्य अभंग टिकण्यासाठी देश बळकट हवा व त्यासाठी देशाच्या नागरिकाचे आरोग्य हे चांगले असावे या दृष्टीने सुदृढ व सशक्त असावा या दृष्टिकोनातून बुस्टर डोसच्या शिबिराचे आयोजन…
जळगाव : प्रतिनिधी धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी रामानंद पोलिसांनी एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात राघो बाबुराव पाटील (वय ६५,धंदा – किराणा दुकान चालक रा. गट न ११९ प्लॉट नं. २ मुकुंद नगर जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. २२ ऑगस्ट रोजी पहाटे ५ ते साडेसहा वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने परिसरातील सार्वजनीक जागेत धार्मिक भावना दुखावतील असे कृत्य केले. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकाँ उषा सोनवणे हाय करीत आहेत.
जळगाव (प्रतिनिधी) शिक्षक पात्रता (टीईटी) परीक्षेतील घोटाळ्यात जळगाव जिल्ह्यातील ६१४ शिक्षक गैरमार्गाने परीक्षेत उत्तीर्ण झालेले आहेत. या सर्व बोगस शिक्षकांना तात्काळ सेवेतून कमी करून विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान थांबविण्यात यावे, अशी मागणी जळगाव राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसने शिक्षणाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, प्रकाशित झालेल्या बातम्यामधून आम्हाला या ६१४ शिक्षका पैकी फक्त ७१ शिक्षकांचे फक्त वेतन थांबविण्यात आले असल्याचे समजले. परंतू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात असल्याने सर्व ६१४ शिक्षकांना पदावरून कमी करून त्यांना अध्यापन करण्यापासून तात्काळ थांबविणे गरजेचे असताना सुद्धा फक्त ७१ शिक्षकांवर कारवाई केली जात आहे. ती सुद्धा फक्त वेतन रोखण्याची यावरून या विषयास प्रशासन गांभीर्याने घेत…
पाचोरा : प्रतिनिधी नोकरीस लावून देण्याचे आमिष दाखवत एका तरुणाची ५ लाखांत फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध पाचोरा पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाचोरा तालूक्यातील आखतवाडे येथील गणेश मोतीलाल गढरी (वय – ३२) यांना शिपाई पदावर नोकरी लावुन देतो असे सांगत गणेश गढरी यांचे चुलत मामा जगन गंगाराम पवार (रा. मोहलाई ता. सोयगाव जि. औरंगाबाद) यांचे परिचयातील सागर रतन बागुल (रा. एकलहरे, मेन गेट सामनगांव रोड, ता. जि. नाशिक) व एस. पी. बोडखे (रा. डोंबिवली ता. कल्याण जि. ठाणे) यांच्याशी ओळख करुन दिली होती. त्यानंतर दि. १९ मार्च २०२१ ते दि. १९ जानेवारी २०२२…
चोपडा : प्रतिनिधी शहरातील बसस्थानकात हरियाणाच्या दोघांना तब्बल १२ कट्ट्यांसह सापळा रचून अटक करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात कट्टे सापडल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. दि. 22 ऑगस्ट 2022 रोजी सांयकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास चोपडा बस स्थानक परिसरात संशयित आरोपी अमीतकुमार धनपत धानिया (वय 30 रा. भागवी ता. चरखी दादरी जि. भिवानी,हरीयाणा) व शनेशकुमार रामचंदर तक्षक (वय 32 रा. भागवी ता.चरखी दादरी जि.भिवानी, हरीयाणा) यांच्याकडे 2 लाख ६० हजार किमंतीचे १२ गावठी बनावटीचे पिस्टल (कट्टा) मॅग्झीनसह तसेच हजार रुपये किमंतीची 5 पिवळया धातूचे जिवंत काडतूस हे कोणास तरी विक्री करण्यासाठी आणले होते. परंतू पोलिसांनी दोघांना सापळा रचून शिताफीने…

