जळगाव : प्रतिनिधी जैन उद्योग समूहाची सेवाभावी संस्था भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे दुसरा व्दिवार्षिक ‘कांताई जैन साहित्य-कला जीवनगौरव पुरस्कार’ जगप्रसिद्ध चित्रकार श्री. प्रभाकर कोलते यांना तर श्रेष्ठ लेखिका म्हणून ‘कवयित्री बहिणाई पुरस्कारा’साठी श्रीमती संध्या नरे-पवार (बोरिवली, मुंबई), श्रेष्ठ कवी म्हणून ‘बालकवी ठोमरे पुरस्कारा’साठी श्री. वर्जेश सोलंकी (वसई, मुंबई) तर श्रेष्ठ गद्यलेखक म्हणून ‘ना. धों. महानोर पुरस्कारा’साठी श्री. प्रवीण बांदेकर (सावंतवाडी) यांना जाहीर झाला आहे. कांताई साहित्य-कला जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप दोन लक्ष रूपये, सन्मानचिन्ह, शाल-श्रीफळ असे आहे तर कवयित्री बहिणाई, बालकवी ठोमरे, ना. धों. महानोर या तिघंही पुरस्काराचे स्वरूप एक लक्ष रूपये, सन्मानचिन्ह, शाल-श्रीफळ असे आहे. कान्हदेशकन्या बहिणाबाई चौधरी यांच्या…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था मराठीबरोबरच हिंदुत्वाच्या मुद्यावर आक्रमक झालेली राज ठाकरे यांची मनसे आता ‘मी हिंदवी रक्षक, मी महाराष्ट्र सेवक’ ही घोषणा देणार आहे. निवडणुकांच्या तोंडावर आजपासून मनसेची सदस्य नोंदणी मोहीम सुरु होणार असून पुण्यात आज राज ठाकरे यांच्या उपस्थितीत या मोहिमेचा शुभारंभ होणार आहे. आगामी निवडणुकांपूर्वी राज्यभर मनसेची सदस्य नोंदणी मोहीम राबवली जाणार आहे. या सदस्य नोंदणी मोहिमेसाठी मनसेनं नवं घोषवाक्य जाहीर केलं आहे. ‘मी हिंदवी रक्षक. मी महाराष्ट्र सेवक’ असं मनसेचं नवं घोषवाक्य असणार आहे. मनसेच्या पुण्यातल्या मध्यवर्ती कार्यालयात आज सकाळी या मोहिमेला सुरुवात होणार आहे. 2014 पासून मनसेच्या राजकीय घोडदौडीला ब्रेक लागलाय. त्यानंतर मनसेनं मशिदीवरील भोंग्यांविरोधात आक्रमक भूमिका…
चोपडा : प्रतिनिधी लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यातच विवाहितेचा तू मुंबई सारख्या ठिकाणी राहण्याच्या लायक नाही, तूझी राहणीमान गावठी असल्याचे हिणवून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिसात पतीसह सासू सासऱ्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रियंका नितीन पाटील (रा.आसनगाव, जि. ठाणे, ह.मु. घाडवेल ता.चोपडा) या विवाहितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ८ मे २०१६ रोजी लग्न झाल्यानंतर २ महिन्यांनी फिर्यादीचे पती नितिन जगन्नाथ पाटील हे पत्नी प्रियंकाला तू मला आवडत नाही. तुझे राहणीमान गावठी आहे. तू मुंबई सारख्या ठिकाणी राहण्याच्या लायक नाही. तु मला शोबत नाही, असे म्हणुन भांडण करित होते. तसेच सासरे जगन्नाथ नामदेव पाटील, सासु उषा जगन्नाथ…
जळगाव (प्रतिनिधी) भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश (राजूमामा) भोळे यांच्या कडून स्वखर्चाने खानदेश कन्या कवियत्री बहिणाबाई चौधरी यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करून प्रतिमा पूजन व माल्यार्पणाचा कार्यक्रम नुकताच पार पडला यावेळी जिल्हाध्यक्ष भाजपा दीपक सूर्यवंशी, माजी महापौर सिमाताई भोळे, नगरसेवक दादा खडके, जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, प्रा भगतसिंग निकम, मनोज (पिंटू) काळे, नगरसेविका सुचिताताई हाडा, दीपमालाताई काळे, महिला आघाडी अध्यक्ष दीप्तीताई चिरमाडे, मंडळ अध्यक्ष केदार देशपांडे, जिल्हा सहप्रसिद्धीप्रमुख व मंडळ सरचिटणीस धीरज वर्मा, मंडळ सरचिटणीस चेतन तिवारी, आघाडीचे प्रमोद वाणि, प्रल्हाद सोनवणे, अनिल जोशी सर, हेमंत जोशी, पूजाताई चौधरी, सुनीताताई चौधरी, व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते व ज्येष्ठ नागरिक ही उपस्थित होते.
हैदराबाद : वृत्तसंस्था अज्ञात संपर्कातून मिळालेल्या व्हॉट्सॲप लिंकवर क्लिक केल्यानंतर एका सेवानिवृत्त शिक्षिकेने तब्बल २१ लाख रुपये गमावल्याची घटना आंध्र प्रदेशात घडली आहे. अन्नमय जिल्ह्यातील मदनपल्ले शहरातील रेड्डेप्पनयडू कॉलनीतील रहिवासी असलेल्या वरलाक्षीने “बँक खात्यातून या पैशांची चोरी झाली आहे. ज्ञात संपर्कातून मिळालेल्या व्हॉट्सॲप लिंकवर क्लिक केल्यानंतर तिच्या बँक खात्यातून पैसे गमावले. तिने लिंकवर क्लिक केल्यानंतर घोटाळेबाजांनी तिचे बँक खाते हॅक केले आणि त्यानंतर तिच्या खात्यातून 21 लाखांची रक्कम एकाच वेळी काढून घेतली. पैसे कापले गेले आहेत” असा संदेश मिळाल्यानंतर वरलाक्षी यांनी स्थानिक पोलिसांकडे तक्रार नोंदवली. घोटाळेबाज तिचे बँक खाते रिकामे करण्यात यशस्वी झाल्यानंतर, तिने बँकेशी संपर्क साधला आणि तिच्या खात्यातून…
मुंबई : वृत्तसंस्था विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आज अभूतपूर्व असा गोंधळ घडला आहे. सत्ताधारी आणि विरोधक आमदारांमध्ये यावेळी जोरदार राडा झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. यावेळी हाऊस सुरु होण्याआधी सत्ताधारी-विरोधक आमनेसामने आले. यावेळी आमदार एकमेकांच्या अंगावर धावले. यावर विचारांची लढाई विचारांनीच लढली गेली पाहिजे. अधिवेशन काळात विधानभवनाच्या सर्व कोड ऑफ कंडक्टचे पालन झाले पाहिजे. तत्वाची लढाई तत्वाने लढावी. असं एकोमेंकांच्या अंगावर जाणे किंवा हात उगारणे योग्य नाही. निषेध किंवा आंदोलन हे शांततेच्या मार्गाने व्हाव, असं राष्ट्रवादीचे आमदार एकनाथराव खडसे यांनी म्हटलं आहे. पावसाळी अधिवेशन सुरू आहे. आज पावसाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. चार दिवस वादळी ठरले. पाचवा दिवस वादळी ठरणार अशी अपेक्षा होती.…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात शिंदे सरकार आल्यानंतर पहिल्यादाच पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गोंधळ पाहायला मिळाला. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये धक्काबुक्की झाली. त्यामुळे गोंधळाचं वातावरण चांगलेच तापलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार विधान भवनाच्या पायऱ्यांवर ठाकरे गटाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करत आहे. त्याचवेळी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे त्यांच्या समर्थक आमदारांसह आले. ठाकरे गट आणि शिंदे गटाचे आमदार आमने सामने आले. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. डरपोक आहोत काय? असं भरत यांनी म्हटलं आहे. शिंदे गटातील नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. आमच्या नादी लागू नका असा इशारा भरत गोगावले यांनी दिला आहे. हा…
जळगाव : प्रतिनिधी शहरात सुभाष चौक परिसरात रामनाथ मुलचंद कोगटा या दुकानात वन विभागाने सोमवारी रात्री टाकलेल्या छाप्यात घुबडाची नखे, समुद्रघोड्यासह आठ प्रकारच्या वन प्राण्यांची विक्रीसाठी ठेवलेली सुमारे ३४७ प्रकारचे अवशेष जप्त करण्यात आले आहे. या घटनेत वन विभागाने डॉ. अजय लक्ष्मीनारायण कोगटा, चुनीलाल नंदलाल पवार, आणि लक्ष्मीकांत रामपाल मनीयार अशा तिघांना अटक करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, शिकार केलेल्या वन्यप्राण्यांचे अवशेष तस्करीसह विक्री केली जात असल्याची माहिती मिळल्याने वन विभागाने टाकलेल्या छाप्यात हा प्रकार उघड झाला आहे. या छाप्यात हताजोडी 11 नग, राजमांजर रंगनी 11, सियारसिंगी 260, कासवपाठ एक, इंद्रजाल 38, नाग मणके 21, घुबडींची नखे 3,…
पाचोरा : प्रतिनिधी तालुक्यातील चुंचाळे शिवारात एका ५० वर्षीय शेतकरीने शेतात विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली होती. या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल पाचोरा पोलीस स्थानकात दोन जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, पाचोरा तालुक्यातील बाळदबु येथील शिवारात चुंचाळे येथील रहिवासी वाल्मिक वामन पाटील(वय ५०) यांनी रतन बळीराम पाटील यांच्या शेतात २२ रोजी रात्री ९ ते ११ वाजेच्या सुमारास विषारी औषध सेवन करून आपली जीवनयात्रा संपविली होती. पाचोरा पोलिसात दिलेल्या मयताची पत्नी सपना पाटील यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार मयत शेतकऱ्याच्या शेतावर यातील रतन बळीराम पाटील, योगेश रतन पाटील यांनी घेतलेल्या ट्रक्टरचा कर्जाचा बोजा बसवलेला असल्याने…
चोपडा : प्रतिनिधी शहरात बहिणीकडे रहायला आलेल्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष देवून पळवून नेवून वेगवेगळ्या ठिकाणी ३ वेळा शारीरीक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर पिडीत मुलीला तिच्या मूळगावी आणल्यानंतर तिने चोपडा पोलिसात फिर्याद दिली. या प्रकरणी सचिन ऊर्फ टिंग्लया मेवा रा.कालीकुंडी ता. वरला जि. बडवाणी ( मध्य प्रदेश) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, पिडीत मुलगी मध्य प्रदेशातून दि. ८ जुलै २०२२ रोजी तिच्या बहीणीकडे चोपडा येथील राहत्या घरी राहावयास आली. त्यादरम्यान पीडितेची बहीनीने, “गावामध्ये तु सचिनच्या नावाने बदनाम झाली” असे सांगितल्याने, दोघींमध्ये भांडण झाले. त्यामुळे पीडित तरुणीने आरोपी सचिन ऊर्फ टिंग्लया मेवा रा.कालीकुंडी ता. वरला जि.…

