जळगाव : प्रतिनिधी मूळजी जेठा महाविद्यालयाच्या एन.सी.सी आणि एन.एस.एस. युनिट आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, आर टी ओ कार्यालय आणि जळगाव वाहतूक कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 25 ऑगस्ट २०२२ रोजी महाविद्यालयात रस्ता सुरक्षा जागृती अभियानासंदर्भात कार्यक्रम सफल झाला. या वेळी प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश ए.ए. शेख, डेप्युटी आर.टी.ओ. श्याम लोही आणि वाहतूक शाखेचे निरीक्षक लीलाधर कानडे यांची व्याख्याने झालीत. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसोर एस.एन. भारंबे हे अध्यक्ष स्थानी होते. श्याम लोही यांनी रस्ता अपघाताची करणे आणि उपाय स्पष्ट केलीत तर न्यायाधीश श्री शेख यांनी कायद्याच्या वाहतूक, रस्ता सुरक्षे बाबत सखोल बाबी छात्र सैनिकांना सांगितल्यात. तसेच त्यानी स्वयंसेवक आणि छात्र सैनिक यांच्या…
Author: editor desk
वरणगाव : प्रतिनिधी अप्पर पोलिस अधिक्षकांच्या आदेशानुसार वरणगाव पोलिसांनी टहाकळी शिवारात छापा टाकला. त्यात १९ जुगारींवर कारवाई करत त्यांचेकडून १ लाख ५६ हजाराची रक्कम जप्त केली. गणेशोत्सवासाठी आयोजित शांतता समितीच्या बैठकीला मुक्ताईनगर कडून वरणगाव येथे आलेले अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांना टहाकळी-चिंचोल मार्गावरील हॉटेल स्वप्नपूर्णाचे मागे जुगार सुरु असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी वरणगाव येथील बैठक आटोपताच एपीआय आशिष अडसूळ, उपनिरीक्षक परशुराम दळवी यांना कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार वरणगाव पोलिसांनी वरील ठिकाणी सायंकाळी ६ वाजता छापा टाकला. त्यात १९ जुगारी आढळले. दोन जण पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी १७ जुगारींकडून १ लाख ५६ हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली.…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था खरी शिवसेना कोणती? या शिंदे आणि ठाकरे गटातील वादावर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर होणारी सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. आता 29 ऑगस्टरोजी या प्रकरणी सुनावणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची सुप्रीम कोर्टातील सुनावणी येत्या 29 ऑगस्ट रोजी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. टीव्ही 9 च्या दिल्लीतील सूत्रांनी ही शक्यता वर्तवली आहे. आज 25 ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टात शिवसेनेच्या (Shivsena) याचिकेवर सुनावणीची तारीख मागील वेळी कोर्टाने दिली होती. मात्र दुपारपर्यंत ही याचिका कोर्टाच्या पटलावर लीस्टच करण्यात आलेली नाही. त्यामुळे याचिका पुढील आठवड्यापर्यंत पुढे ढकलली जाण्याची दाट शक्यता आहे. 23 ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टात झालेल्या…
पालघर : वृत्तसंस्था मनोर विक्रमगड रस्त्यावर झालेल्या बस आणि टेंपो अपघातात पाच प्रवासी जखमी झाले आहेत. आज सकाळच्या सुमारास पालघरहून अमळनेरकडे जाणाऱ्या बसला टेम्पोने समोरा समोर धडक दिली. ही धडक इतकी भाषण होती की बसचा पुढचा भागाचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात पाच प्रवासी जखमी झाले असून सर्व जखमींवर मनोर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, ही बस नाशिक, धुळे मार्गे अमळनेर येणार होती. दरम्यान, जुलै महिन्यात इंदोरकडून अमळनेरकडे जाणारी राज्य परिवहन महामंडळाची बस अचानक मध्य प्रदेशातील खलघाट आणि ठिगरी मधील नर्मदा नदीत कोसळली होती. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पुन्हा एकदा अमळनेरला येणाऱ्या बसचा अपघात…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज सकाळी 11 वाजता आपल्या निवासस्थानी सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. मात्र, आपचे काही आमदार नॉटरिचेबल असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रानंतर आता दिल्लीतही भाजपचे ऑपरेशन लोटस सुरू झाल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. आम आदमी पक्षाला भाजप आपले आमदार फोडेल की काय अशी शंका होती. त्यामुळे काल संध्याकाळी आम आदमी पक्षाच्या राजकीय घडामोडी समितीच्या बैठकीत सर्व आमदारांचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतू या बैठकीच्या आधीच आपचे काही आमदार नॉटरिचेबल झाले आहेत. दिल्लीत आम आदमी पक्षाचे एकूण 62 आमदार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार होती. दरम्यान, भाजपने आमच्या…
अमळनेर : प्रतिनिधी तुम्हाला ‘फोन पे’ बॅकेची ऑफर असल्याचे सांगत एका भामट्याने अमळनेरच्या व्यक्तीला ५० हजाराचा गंडा घातला आहे. या प्रकरणी अमळनेर पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात रविद्र दगा चौधरी (रा.एलआयसी कॉलोनी सम्राट हॉटेल मागे, अमळनेर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, २१ ऑगस्ट रोजी दुपारी १२.४५ रविद्र चौधरी हे आपल्या घरी होते. त्यावेळी त्यांच्या मोबाईलवर ९८८३१२५६०५ या नंबरवरून एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. त्याने श्री. चौधरी यांना सांगितले की, तुम्हाला ‘फोन पे’ बॅकेची ऑफर आहे. तरी तुम्ही मी सांगतो तशी प्रक्रीया करा. त्यानंतर त्याने श्री. चौधरी यांना फोनवर एक लिंक पाठवली. त्यानंतर…
जळगाव : प्रतिनिधी गेल्या आठवड्यात जिल्हा दुध संघाच्या प्रशासक मंडळ व संचालक मंडळाचे वाद थेट पोलीस स्टेशन पर्यंत गेले होते, त्यानंतर जिल्हा सहकारी दूध संघात प्रशासक मंडळ आणि संचालक मंडळ यांच्यात सुरू असलेल्या दाव्यांबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर आता येत्या शुक्रवारी कामकाज हाेणार आहे. दूध संघातील संचालक मंडळ बरखास्त करून तेथे प्रशासक मंडळ नियुक्तीचे आदेश शासनाकडून काढण्यात आले हाेते. दरम्यान, संचालक मंडळाने प्रशासक मंडळ नियुक्तीविराेधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. प्रशासक मंडळाने घेतलेला पदभार बेकायदेशीर असल्याचा दावा संचालकांनी केला आहे. दरम्यान, या विषयावर न्यायालयीन कामकाज सुरू आहे. बुधवारी या विषयावर सुनावणी हाेणार हाेती; परंतु आता…
जळगाव : प्रतिनिधी स्वस्तात मोबाईल देण्याच्या नावाखाली एकाने जळगावच्या तरुणाची तब्बल पावणे बारा लाखांत फसवणूक केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात पुण्याच्या दीपक प्रभू (रा.बाणेर) नामक व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात प्रथमेश विनायक राणे (वय १८, व्यवसाय शिक्षण, रा. गणेश कॉलनी जळगाव) या तरुणाने फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, दीपक प्रभू याने दि. ८ फेब्रुवारी २०२२ ते १३ मार्च २०२२ या कालावधीत प्रथमेशला कमी किमतीत मोबाईल देतो, असे खोटे सांगत, त्याच्याकडून अॅडव्हान्स पेमेंट म्हणून ११ लाख ७५ हजार रुपये ऑनलाईन घेतले. परंतू अनेक दिवस उलटूनही मोबाईल दिले नाही. एवढेच नव्हे तर प्रथमेशने आपले पैसे परत देण्याची मागणी…
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील पिंप्री खुर्द येथे संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त समाज बांधव व भजनी मंडळातर्फे संत सेना महाराज यांना अभिवादन करण्यात अाले. प्रारंभी गावातून संत सेना महाराज यांच्या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडी द्वारे गावात सामाजिक जागृतीचा संदेश देण्यात आला. या प्रसंगी पिंप्री येथील नाभिक समाजाचे अध्यक्ष राजेंद्र बोरसे, सर्व सदस्यांसह अरुण चित्ते, नाना सूर्यवंशी, रमण बोरसे, बापू महाले, देविदास सोनगिरे, संतोष सोनावणे, संतोष सोनगिरे, जयेश सोनगिरे, राजेंद्र सोनवणे, हिंमत सोनवणे, एकनाथ सोनगिरे, नवल सोनगिरे, गजानन बोरसे, नीलेश सोनगिरे, दादा निकम यांच्यासह सर्व नाभिक समाजबांधव उपस्थित होते. धरणगाव येथील अखिल भारतीय जिवाजी सेनेच्या वतीने आज…
भडगाव : प्रतिनिधी तालुक्यातील पळासखेडे येथे पेव्हर ब्लॉकचे काम न करता साधारण दीड लाखांचा अपहार केल्याप्रकरणी जिल्हा परिषदच्या तत्कालीन उपअभियंत्यासह चार अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. सविस्तर वृत्त असे की, विस्तार अधिकारी भालचद्र नाटू पाटील(वय ५७, रा.वृदावन कॉलनी, ढेकू रोड अमळनेर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, सन २०१९-२० मधील पळासखेडे ता. भडगाव येथील ग्राम पंचायतीला २५/१५ या लेखा शिर्षाखाली पेव्हरब्लॉक बसविणे बाबतचे कामाचे अनुदान प्राप्त होते. त्यात झालेल्या पेव्हर ब्लॉक बसविणीचे कामात पळासखेडे येथील १) शिवाजी पाटील ते बहादुर पाटील – ९९ चौरस मीटर २) तुकाराम पाटील २५.८४ ३) रतीलाल पाटील ४२.०५ चौरस मीटर या…

