जळगाव : प्रतिनिधी स्वातंत्र्याचा इतिहास हा बलिदान आणि शौर्याचा आहे. स्वातंत्र्यविरांच्या पराक्रमाच्या या गाथेचे स्मरण करीत समतेसोबतच विश्वशांतीचा संदेश देणारी विशेष सजावट चौकांमध्ये करण्यात आली आहे. तिरंग्यातील शौर्य, शांती, त्यागाच्या तिनही रंगाच्या विद्युत रोषणाईने जळगाव शहर उजाळुन निघाले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने जैन उद्योग समूहाच्या जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. व भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन तर्फे आकर्षक रंगसंगती असणारी विद्युत रोषणाई केली आहे. यात शहरातील राष्ट्रीय महापुरूषांच्या १९ पुतळ्यांसह, लालबहादूर शास्त्री टॉवर, स्वातंत्र्य चौक, काव्यरत्नावली चौक यासह महात्मा गांधी उद्यान, भाऊंचे उद्यान यांचा समावेश आहे. यातुन शहरवासियांच्या मनात राष्ट्राभिमानाचा जागर होत आहे. जैन उद्योग समूहाच्या जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.…
Author: editor desk
पाचोरा : प्रतिनिधी तालुक्यातील दहिगाव येथे राहत असलेल्या चौथीच्या विद्यार्थ्याने घरात कोणीही नसतांना गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. हि घटना समजताच मन सुन्न होत आहे सविस्तर वृत्त असे की, दहिगाव (संत) येथील गौरव प्रविण पाटील (वय – ११) याने घरातील दरवाजा आतून बंद करून छताला दोरी बांधून गळफास घेतला. वडील प्रविण नथ्थू पाटील हे सपत्नीक नाशिक येथे नातेवाईकांकडे कार्यक्रमासाठी गेलेले असताना ही दुदैवी घटना घडली. घरी गौरव व मोठा मुलगा कॄष्णा यांची जबाबदारी आपले भाऊ रविंद्र पाटील यांच्या कडे सोपविली होती. कृष्णा हा बाहेरून घरी परतल्यावर त्याने दार उघडण्याचा प्रयत्न केले मात्र आतून दार बंद असल्याने त्याने काका…
मुबंई : वृत्तसंस्था स्वत्र्यांच्या अमृत महोस्तवानिमित्त देशभर ‘हर घर तिरंगा’ अभियानचे देशभर आयोजन करण्यात येत आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आग्रहानंतर हर घर तिरंगा फडकवण्याचं अभियान भारतात राबवण्यात येतंय. अनेक सेलिब्रिटींनीदेखील या अभियानाचं समर्थन केलंय. बॉलीवुड अभिनेता आमिर खानने देखील या अभियानाचं समर्थन करत त्याच्या राहत्या घरावर झेंडा फडकवलाय. आमिरची मुलगी ईरा खान आणि आमिर यांचा त्यांच्या बालकनीतील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या फोटोमध्ये आमिरच्या बाजूला भारतीय ध्वजही दिसतोय. एकीकडे आमिरच्या लाल सिंग चढ्ढा या चित्रपटातून भारतीय सैन्याचा अपमान केल्याचा गंभीर आरोप केला जातोय तर दुसरीकडे आमिरच्या घरावरील तिरंग्यातून त्याचं देशप्रेम दिसून येतंय. त्यामुळे त्याचा हा फोटो…
भुसावळ : प्रतिनिधी ‘स्वातंत्राचा अमृत महोत्सव’ अंतर्गत “हर घर तिरंगा” अभियानाचा भाग म्हणुन भुसावळ रेल्वे विभागातून धावणारी भुसावळ-इगतपुरी मेमू एक्सप्रेस ही रेल्वेगाडी “तिरंगा एक्सप्रेस” म्हणुन चालविणे बाबत नाशिक व जळगांव जिल्हा प्रशासन आणि रेल्वे विभागामार्फत आयोजन करण्यात आले होते. सदर “तिरंगा एक्सप्रेस” चे भुसावळ रेल्वे स्टेशन येथे खा. रक्षाताई खडसे, आ.संजय सावकारे व एडीआरएम रुखमैय्या मीना यांच्यासह तिरंगा झेंडा दाखवत स्वागत केले. तसेच “भुसावळ – इगतपुरी मेमू एक्सप्रेस” ह्या “तिरंगा एक्सप्रेस” मध्ये प्रवास करणाऱ्या शालेय विद्यार्थी, जेष्ठ नागरिक या प्रवाशांशी संवाद साधून स्वातंत्र दिनाच्या शुभेच्छा देऊन तिरंगा ध्वज वितरीत केले. यावेळी खा.खडसे यांच्यासोबत आ.संजय सावकारे, एडीआरएम रुखमैय्या मीना, अडकम पाठक,…

