जळगाव : प्रतिनिधी गांधी रिसर्च फाऊंडेशन जिल्ह्यासाठी मानबिंदू असून फाऊंडेशनतर्फे समाजप्रबोधनात्मक सांस्कृतिक उपक्रम सदैव सुरू असतात. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षानिमित्त गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे महात्मा गांधी उद्यान येथे स्वातंत्र्य संग्रामातील महत्त्वपूर्ण घटनांवर आधारित ‘भारतीय स्वातंत्र्याची गाथा’ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना आपल्या गौरवशाली, क्रांतिकारी इतिहासाची आठवण प्रदर्शन पाहिल्यानंतर होते. स्वातंत्र्याचा इतिहास चित्रस्वरूपात रोचकपध्दतीने मांडण्यात आला असून त्यात संविधान निर्मिती, संस्थाने विलगिकरणसह अन्य महत्त्वाच्या बाबी युवा पिढीला प्रेरक आहे. असे सांगत स्वातंत्र्याची गाथा समजून घेण्यासाठी जळगावकरांनी प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. यावेळी महात्मा गांधी उद्यानातील ‘आय लव्ह जळगाव’ या सेल्फी पाँईटचेही…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात शिंदे सरकारचा तब्बल ३९ दिवसांनी मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खातेवाटप सुद्धा रखडला होता. त्यामुळे खातेवाटप कधी होणार अशी चर्चा राज्यभर रंगू लागली आहे. आता अखेरीस खातेवाटपाची यादी फायनल झाली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे यादी पाठवण्यात आली असून लवकरच खातेवाटप जाहीर होणार आहे. शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार तर झाला पण खातेवाटप होत नसल्यामुळे मंत्री आपल्या दालनात जाण्यापासून ताटकळत उभे राहिले होते. अखेरीस राज्य सरकारच्या नव्या कॅबिनेट मंत्र्यांचे खातेवाटप राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवण्यात आली आहे. राज्यपाल कोश्यारी यांच्या स्वाक्षरीनंतर राज्य सरकारच्या खातेवाटप लवकरच जाहीर होणार आहे. विशेष म्हणजे, उद्या भारताचा स्वातंत्र्य दिन आहे, अजूनही पालकमंत्री कोण असणार…
धरणगाव : प्रतिनिधी राज्यात शिवसेनेला सोडून गुलाबराव पाटील शिंदे गटात दाखल झाले होते त्यानंतर गुलाबराव पाटील यांना मंत्री मंडळात कॅबिनेट मंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर जळगाव जिल्हात शिंदे गट व पाटील समर्थकांनी त्यांचे जंगी स्वागत केले पण धरणगावात ना. गुलाबराव पाटलांनी धरणगाव शहरातील महापुरूषांच्या स्मारकाला माल्यार्पण केले होते. मात्र शिवसेनेने आज १४ रोजी आक्रमक होत महापुरूषांच्या त्या स्मारकांना दूग्धाभिषेक करून शुध्दीकरण केले. शिवसेनेचे जळगाव ग्रामीण मतदार संघातून निवडून आलेले आमदार गुलाबराव पाटील यांनी शिंदे गटात सामिल झाल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राज्यात शिंदे गट आणि भाजपचे सत्ता स्थापन केली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची निवड झाल्यानंतर मंत्रीमंडळाचा विस्तार झाला आहे. यात…
पाचोरा : प्रतिनिधी नगरपालिकेत कंत्राटी पदावर कार्यरत असलेल्या एका २५ वर्षीय तरुणाने आज १४ रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शहरात उघडकीस आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. घटनेबाबत पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे की, पाचोरा शहरातील जवाहर हौसिंग सोसायटी येथील रहिवाशी असलेल्या अनिल बागुल (वय – २५) हा तरुण पाचोरा नगरपालिकेत कंत्राटी पदावर कार्यरत आहे. या तरूणाने रविवारी १४ ऑगस्ट रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरात गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविले. सदरचा प्रकार बाजुच्या खोलीत असलेल्या त्यांच्या परिवाराच्या लक्षात येताच परिवारातील सदस्यांनी एकच हंबरडा फोडला. घटना…
जळगाव : प्रतिनिधी आचार्य अत्रे हे साहित्य, नाट्य, चित्रपट, उद्योग, वक्तृत्व असा सर्वच क्षेत्रांतील सार्वभौम उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या नावाने मिळालेले मानचिन्ह मी कृतज्ञतेने स्विकारतो असे प्रतिपादन कविवर्य ना. धों. महानोर यांनी सत्काराला उत्तर देताना केले. संयुक्त महाराष्ट्राचे झुंजार सेनापती, साहित्य सम्राट, आचार्य प्र. के. अत्रे यांच्या १२४ व्या जयंतीदिनी (१३ ऑगस्ट) आचार्य अत्रे मानचिन्हाचा पुरस्कार यावर्षी प्रख्यात कवी ना. धो. महानोर यांना प्रदान केला. ‘आत्रेय’ तर्फे हा पुरस्कार प्रदान समारंभ पहिल्याप्रथम मुंबई शिवाय खानदेशात जैन हिल्सला झाला. व्यासपीठावर कविवर्य ना. धों. महानोर, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, आ. शिरीष चौधरी, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे उपस्थित होते. आरंभी मान्यवरांच्या हस्ते…
जळगाव : प्रतिनिधी ‘आपल्या मातृभूमिला गुलामगिरीतुन मुक्त करण्यासाठी संपूर्ण भारत पेटून उठला होता. प्रत्येकाच्या मनात भारतीय हीच भावना जागृत होऊन स्वातंत्र्याचा संग्राम घडला.’ या स्वातंत्र्य संग्रामात जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांचे व त्यांना मदत करणाऱ्या असंख्य जिल्हावासीयांचे योगदान अधोरेखित करण्यासारखे आणि प्रेरणादायी आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वातंत्र्य सैनिकांच्या याच कार्याचे स्मरण करत जैन उद्योग समूहाने कंपनी आस्थापनांमधील ध्वजारोहण स्वातंत्र्य सैनिकांच्या पत्नी यांच्यासह ज्यांनी पारतंत्र्य अनुभवले आहे, अशा ज्येष्ठ नागरिकांच्याहस्ते करण्याचे योजले आहे. यामध्ये 1942 च्या स्वातंत्र्य चळवळीसह, देवकीनंदन नारायण यांच्या मार्गदर्शनाखाली स्वातंत्र्य संग्रामातील भुमिगत चळवळीत सहभागी होऊन धुळे येथे कारागृहात बंदिवान राहिलेले स्व. भगवान कंडारे यांच्या पत्नी श्रीमती लक्ष्मीबाई कंडारे यांच्याहस्ते…
जळगाव : प्रतिनिधी स्वातंत्र्याचा इतिहास हा बलिदान आणि शौर्याचा आहे. स्वातंत्र्यविरांच्या पराक्रमाच्या या गाथेचे स्मरण करीत समतेसोबतच विश्वशांतीचा संदेश देणारी विशेष सजावट चौकांमध्ये करण्यात आली आहे. तिरंग्यातील शौर्य, शांती, त्यागाच्या तिनही रंगाच्या विद्युत रोषणाईने जळगाव शहर उजाळुन निघाले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने जैन उद्योग समूहाच्या जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. व भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन तर्फे आकर्षक रंगसंगती असणारी विद्युत रोषणाई केली आहे. यात शहरातील राष्ट्रीय महापुरूषांच्या १९ पुतळ्यांसह, लालबहादूर शास्त्री टॉवर, स्वातंत्र्य चौक, काव्यरत्नावली चौक यासह महात्मा गांधी उद्यान, भाऊंचे उद्यान यांचा समावेश आहे. यातुन शहरवासियांच्या मनात राष्ट्राभिमानाचा जागर होत आहे. जैन उद्योग समूहाच्या जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.…
पाचोरा : प्रतिनिधी तालुक्यातील दहिगाव येथे राहत असलेल्या चौथीच्या विद्यार्थ्याने घरात कोणीही नसतांना गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. हि घटना समजताच मन सुन्न होत आहे सविस्तर वृत्त असे की, दहिगाव (संत) येथील गौरव प्रविण पाटील (वय – ११) याने घरातील दरवाजा आतून बंद करून छताला दोरी बांधून गळफास घेतला. वडील प्रविण नथ्थू पाटील हे सपत्नीक नाशिक येथे नातेवाईकांकडे कार्यक्रमासाठी गेलेले असताना ही दुदैवी घटना घडली. घरी गौरव व मोठा मुलगा कॄष्णा यांची जबाबदारी आपले भाऊ रविंद्र पाटील यांच्या कडे सोपविली होती. कृष्णा हा बाहेरून घरी परतल्यावर त्याने दार उघडण्याचा प्रयत्न केले मात्र आतून दार बंद असल्याने त्याने काका…
मुबंई : वृत्तसंस्था स्वत्र्यांच्या अमृत महोस्तवानिमित्त देशभर ‘हर घर तिरंगा’ अभियानचे देशभर आयोजन करण्यात येत आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आग्रहानंतर हर घर तिरंगा फडकवण्याचं अभियान भारतात राबवण्यात येतंय. अनेक सेलिब्रिटींनीदेखील या अभियानाचं समर्थन केलंय. बॉलीवुड अभिनेता आमिर खानने देखील या अभियानाचं समर्थन करत त्याच्या राहत्या घरावर झेंडा फडकवलाय. आमिरची मुलगी ईरा खान आणि आमिर यांचा त्यांच्या बालकनीतील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या फोटोमध्ये आमिरच्या बाजूला भारतीय ध्वजही दिसतोय. एकीकडे आमिरच्या लाल सिंग चढ्ढा या चित्रपटातून भारतीय सैन्याचा अपमान केल्याचा गंभीर आरोप केला जातोय तर दुसरीकडे आमिरच्या घरावरील तिरंग्यातून त्याचं देशप्रेम दिसून येतंय. त्यामुळे त्याचा हा फोटो…
भुसावळ : प्रतिनिधी ‘स्वातंत्राचा अमृत महोत्सव’ अंतर्गत “हर घर तिरंगा” अभियानाचा भाग म्हणुन भुसावळ रेल्वे विभागातून धावणारी भुसावळ-इगतपुरी मेमू एक्सप्रेस ही रेल्वेगाडी “तिरंगा एक्सप्रेस” म्हणुन चालविणे बाबत नाशिक व जळगांव जिल्हा प्रशासन आणि रेल्वे विभागामार्फत आयोजन करण्यात आले होते. सदर “तिरंगा एक्सप्रेस” चे भुसावळ रेल्वे स्टेशन येथे खा. रक्षाताई खडसे, आ.संजय सावकारे व एडीआरएम रुखमैय्या मीना यांच्यासह तिरंगा झेंडा दाखवत स्वागत केले. तसेच “भुसावळ – इगतपुरी मेमू एक्सप्रेस” ह्या “तिरंगा एक्सप्रेस” मध्ये प्रवास करणाऱ्या शालेय विद्यार्थी, जेष्ठ नागरिक या प्रवाशांशी संवाद साधून स्वातंत्र दिनाच्या शुभेच्छा देऊन तिरंगा ध्वज वितरीत केले. यावेळी खा.खडसे यांच्यासोबत आ.संजय सावकारे, एडीआरएम रुखमैय्या मीना, अडकम पाठक,…

