चाळीसगाव : प्रतिनिधी
पाच लाखांसाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी चाळीसगाव पोलिसात सासरच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, शाहीनाबी महेमूद शेख (वय ३०, धंदा – गृहिणी रा.हुडको कॉलनी, चाळीसगाव) या पिडीत विवाहीने चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. विवाहितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पती – शेख महेमूद शेख नूरा, जेठ – कलीम शेख नूरा, शेख शकील नुरा, जेठानी – मुमताज शेख शफी, शेख जवराहारून, सासू खैरुनिसा शेख नुरा (सर्व रा.शेदुर्णी, ता. जामनेर) यांनी माहेरुन ५ लाख रुपये प्लॉट घेण्यासाठी मागणी केली. तसेच शिवीगाळ करुन मारहाण करून अंगावरुन सोन्याचे दागिने काढून घेतले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोका भगवान उमाळे हे करीत आहेत.