जळगाव : प्रतीनिधी
घरासमोर माती टाकल्याच्या कारणावरून एका वृद्धासह मुलाला तीन जणांनी शिवीगाळ करत दगडाने मारहाण केली. ही घटना मंगळवारी सुजदे गावात घडली. याप्रकरणी तीन जणांविरुद्ध तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील सुजदे गावात पंढरीनाथ लहान सोनवणे (वय ६०) हे वृद्ध आपले परिवारासह वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत असतात. मंगळवारी सकाळी ७ वाजता त्यांच्या गल्लीत राहणारा बाळू देवा सोनवणे याने त्यांच्या घरासमोर माती टाकली. त्यावर पंढरीनाथ सोनवणे यांनी माती टाकू नको असे सांगितले, याचा राग आल्याने बाळू देवा सोनवणे, गोपाळ बाळू सोनवणे आणि जिजाबाई बाळू सोनवणे या ठिकाणी पंढरीनाथ सोनवणे यांच्या अंगावर दगड फेकून दुखापत केली तर भांडण सोडवण्यासाठी आलेला मुलगा शशिकांत सोनवणे याला देखील चपटाबुक्क्यांनी मारहाण करून दुखापत केली.
ही घटना घडल्यानंतर वृद्धाने तालुका पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी बाळू देवा सोनवणे, गोपाळ बाळू सोनवणे आणि जिजाबाई बाळू सोनवणे या तिघांविरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल नरेंद्र पाटील करीत आहे.